बस-ट्रेलर अपघातात दोन ठार; २९ जखमी

By admin | Published: September 21, 2014 11:47 PM2014-09-21T23:47:15+5:302014-09-21T23:49:47+5:30

अहमदनगर : एस़ टी़ बस व कंटेनरच्या यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना अहमदनगरजवळील इमामपूर घाटात घडली़

Two killed in bus-trailer crash; 29 injured | बस-ट्रेलर अपघातात दोन ठार; २९ जखमी

बस-ट्रेलर अपघातात दोन ठार; २९ जखमी

Next

अहमदनगर : एस़ टी़ बस व कंटेनरच्या यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना अहमदनगरजवळील इमामपूर घाटात रविवारी (दि़ २१) पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली़ जखमींमध्ये पुण्यातील सात जणांचा समावेश असून, एक जण जागीच मयत झाला असून दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अंबड-पुणे ही बस (क्रमांक एम.एच. २०, बी.एल. २९६६) रात्री अंबडहून निघून पुण्याकडे जात होती़ ही बस अहमदनगरजवळील इमामपूर घाट चढत असताना पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एच़ आऱ ४६, सी़ ४९०३) बसला जोरदार धडक दिली़ ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या डिझेल टाकीपासून पाठीमागेपर्यंत बसचा पत्रा कापला गेला़ खिडकीच्या बाजूला बसलेले पांडुरंग राजेंद्र आळंदीकर (वय़ ६५, रा़ चंदननगर, जि़ पुणे) हे जागीच ठार झाले़ तर उपचार सुरु असताना संजय वसंत जोशी (चंदननगर, पुणे) यांचा मृत्यू झाला. बसचालक रामेश्वर आरण हे जखमी झाले असून, वाहक शेख आलमनूर हसन यांना किरकोळ मार लागला आहे़ अपघातातील जखमींना नगरच्या जिल्हा रुग्णालयात व इतर तिघांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे़ कंटनेर चालक फरार झाला असून, क्लिनर राजकुमार तेजुराम यादव (वय २७, रा़ माकीपूर, ता़ जलालपूर, जि़ आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश), शिवशंकर विजयबहादूर यादव व सिकंदर राजाराम पाल (रा़ सहलीपूर, ता़ जोनपूर, उत्तरप्रदेश) हे जखमी आहेत़ त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार चौधरी तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
जखमींमध्ये संदीप बाळासाहेब झोल (वासीम, ता़ करमाळा, जि़सोलापूर), अरुण गंगाराम इंगळे (जि़बुलढाणा), कुसुम अरुण इंगळे, राजेश आनंद सराफ (रा़ सावेडी़ अहमदनगर), विनोद विठ्ठल मोडेकर (नेहरुनगर, औरंगाबाद), विनायक रमेश वाळके (औरंगाबाद), राजकुमार कार्तिक दुर्वे, तुळसाबाई देवीदास हेंद्रे (जाफराबाद), मनिषा साहेबराव बागुल (हडको, औरंगाबाद), वनिता साहेबराव बागुल (हडको, औरंगाबाद), रफिक मोहमद शेख (दापोडी, पुणे), बद्रीनारायण ज्ञानबा घुगे (मांडवा, ता़ रिसोड, जि़ वाशिम), राहुल रवींद्र चौक (नांदेड), प्रशांत गजाजन ठाकरे (अकोला), स्वप्नील राजेश इंगोले (मोरगाव,जि़अकोला), धोंडिराम जयराम नरवडे (काळेवाडी, पुणे), देवीदास सटवा हेंद्रे (वरुड,ताक़रमाळा, जि़सोलापूर), बाबासाहेब अर्जुन कदम (न्हावरे,ता़शिरुर, जि़पुणे), विश्वास काशिनाथ बानोसे (मालखेड, ता़सिंधखेडराजा, जि़बुलढाणा), सुभाष हिरालाल कर्नावट (नवीपेठ, अहमदनगर), इकबाल सरदार पटेल (निमगाव समद, ता़ जुन्नर, जि़ पुणे),
शेख नवाब शेख हसन (रा़जालना), हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़

Web Title: Two killed in bus-trailer crash; 29 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.