स्पर्धेच्या माध्यमातून समाजमंथन करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:22 AM2021-03-17T04:22:26+5:302021-03-17T04:22:26+5:30

अहमदनगर : कॉ. बापूसाहेब भापकर यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांची तळमळ आजच्या तरुण पिढीस मार्गदर्शक ...

Trying to socialize through competition | स्पर्धेच्या माध्यमातून समाजमंथन करण्याचा प्रयत्न

स्पर्धेच्या माध्यमातून समाजमंथन करण्याचा प्रयत्न

Next

अहमदनगर : कॉ. बापूसाहेब भापकर यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांची तळमळ आजच्या तरुण पिढीस मार्गदर्शक आहे. त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे यासाठी त्यांच्या नावे वक्तृत्व स्पर्धा सुरू करून समाजमंथन करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले.

न्यू लॉ कॉलेज आयोजित कॉ. बापूसाहेब भापकर आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्राचार्य झावरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत वाघ, कार्यकारिणी सदस्य प्रा. अर्जुनराव पोकळे, दीपक दरे, प्राचार्य एम. एम. तांबे, प्रा. रामेश्‍वर दुसुंगे आदी उपस्थित होते. जयंत वाघ म्हणाले, बापूसाहेब भापकरांनी समाजसेवेपेक्षा समाजसुधारणांवर भर दिला. चांगला वकील होण्यासाठी वक्तृत्व गुण आवश्यक असल्याने अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. दीपक दरे यांनी बापूसाहेबांसारखे अनुयायी घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य तांबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. रामेश्‍वर दुसुंगे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी, तर आभार प्रा. डॉ. बी. डी. पांढरे यांनी मानले. स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा संस्थेचे विश्‍वस्त इंजि. मुकेश मुळे होते. कार्यकारिणी सदस्य डॉ. अभय खानदेशे, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रा. अतुल म्हस्के, प्रा. डॉ. अतुल मोरे, प्रा. व्ही. ई. शिंदे, प्रा. जी. ए. हिरडे, प्रा. अनुराधा मते, प्रा. माउली मोरे, प्राजक्ता कुलकर्णी, एन. एस. कानवडे, शरद पुंड आदींनी परिश्रम घेतले.

-----------

स्पर्धेचा निकाल

प्रथम - प्रतिम कुलकर्णी, गौरी महाजन (पुणे), द्वितीय - वृषाली रोहोकले, ऋतुजा गंगावणे, तृतीय - निकिता सोनी, हर्षदा करमळ (पुणे), उत्तेजनार्थ - प्रज्वल नरवडे, पवन गरड (पाथर्डी).

----------

फोटो - १६ न्यू लाॅ काॅलेज

न्यू लॉ कॉलेज आयोजित कॉ. बापूसाहेब भापकर आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्राचार्य डाॅ. बी. एच. झावरे, जयंत वाघ, प्रा. अर्जुनराव पोकळे, दीपक दरे, प्राचार्य एम. एम. तांबे आदी.

Web Title: Trying to socialize through competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.