पाथर्डी शहरातील ट्रक्टर शोरूमला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:19 AM2018-09-27T11:19:50+5:302018-09-27T11:20:11+5:30

शहरातील नगर रोडवरील महिंद्रा शोरूमला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भिषण आग लागली.

A tragic showroom in Pathardi city, a fierce fire | पाथर्डी शहरातील ट्रक्टर शोरूमला भीषण आग

पाथर्डी शहरातील ट्रक्टर शोरूमला भीषण आग

googlenewsNext

पाथर्डी : शहरातील नगर रोडवरील महिंद्रा शोरूमला सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भिषण आग लागली. या आगीत शोरूममधील ट्रक्टरसह शोरूमचे कार्यालय खाक झाले.
नगर रोड वरील बाबूजी आव्हाड महाविद्यालयासमोर भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचे ट्रक्टरचे शोरूम आहे. याच ठिकाणी आॅईल देखील ठेवण्यात आले होते. सकाळी साडेनऊच्या दरम्यान शोरूमच्या आतून धूर येत असल्याचे रस्त्याने ये जा करणा-या नागरिकांनी पाहिले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या बंब बोलवण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी शोरूममधील ट्रक्टर बाहेर काढले. आदिनाथ साखर कारखाना, पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीच्या कारण अद्याप समजू शकले नाही. पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवरील कापड दुकानाला लागलेली आग, तहसील कार्यालयाच्या जुन्या रेकोर्ड रूमला लागलेली आग तसेच ट्रक्टर शोरूमला लागलेल्या आगीचे कारणे अद्याप स्पष्ट झाली नसल्याने सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

 

Web Title: A tragic showroom in Pathardi city, a fierce fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.