सारोळा कासारमध्ये कोरोना हद्दपारीसाठी ‘थ्री टी पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:21+5:302021-05-09T04:22:21+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या सरपंच आरती कडूस यांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि जय शंकर मित्रमंडळातील तरुण ...

'Three T pattern' for corona deportation in Sarola Kasar | सारोळा कासारमध्ये कोरोना हद्दपारीसाठी ‘थ्री टी पॅटर्न’

सारोळा कासारमध्ये कोरोना हद्दपारीसाठी ‘थ्री टी पॅटर्न’

googlenewsNext

केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या सरपंच आरती कडूस यांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि जय शंकर मित्रमंडळातील तरुण यांची एक टीम तयार करून सारोळ्यात ६० बेडचे 'गुरू शंकर टेस्टिंग ॲण्ड क्वारंटाइन सेंटर' सुरू केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी थ्री टी (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटिंग) फॉर्म्युलाचा अवलंब करून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प केला आहे.

त्यांनी सुरुवात ट्रेसिंग आणि टेस्टिंगपासून केली. प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी आणि आशा सेविका, जिल्हा परिषद शिक्षक यांचे ५ ग्रुप तयार करून गावातील प्रत्येक नागरिकांची घरी जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये प्रत्येकाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि तापमानाची नोंद घेतली. ज्याला लक्षणे जाणवली त्याला लगेच टेस्ट करून विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. एकीकडे ट्रेसिंग सुरू असताना दुसरीकडे त्याच सोबत रॅपिड टेस्टचा सपाटा लावला. सरपंच आरती कडूस यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने गावात जानेवारीपासून ९८० मोफत रॅपिड टेस्ट केल्या. ६७८ टेस्ट गेल्या दीड महिन्यात केल्या. पॉझिटिव्ह रुग्णांना तत्परतेने औषधोपचारासाठी प्रवृत्त केले.

नगर येथील डॉ. प्राजक्ता पारधे येथे कोविड सेंटरमधील रुग्णांची मोफत तपासणी करीत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. अतुल संचेती, डॉ. राहुल ठोकळ, डॉ. सुविधा धामणे, डॉ. राहुल धामणे येथे दररोज रुग्ण तपासणी करीत आहेत. सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका, गोडसे, वाबळे, मिजबा इनामदार या ठिकाणी मोफत रुग्णसेवा करीत आहेत. कोरोना समिती अध्यक्ष म्हणून सरपंच कडूस, ग्रामसेवक कसबे, तलाठी भोगे, पर्यवेक्षक आत्माराम धामणे, ग्रामपंचायत कर्मचारी राहिंज, महंमद तांबोळी, शेख विद्यालयाचे प्राचार्य भिटे, सुपरवायझर भास्कर कोकाटे यांच्यासह जिल्हा परिषद शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक येथे व्यवस्थापनात मदत करीत आहेत.

---

क्वारंटाइन सेंटरसाठी अनेकांची मदत..

रुग्णांची संख्या वाढू लागताच गावातील निर्बंध अधिक कडक केले. गंभीर रुग्णांसोबतच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची औषधोपचारासाठी आणि विलगीकरणासाठी सुरू असलेली परवड पाहून सद्गुरू राजाभाऊ कोठारी यांच्या प्रेरणेतून जय शंकर मित्रमंडळ आणि ग्रामपंचायतीने २२ एप्रिल 'संपूर्ण मोफत' ‘क्वारंटाइन सेंटर’ गावातच सुरू केले. यासाठी गावातील अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. सरपंच आरती कडूस, पं. स. सदस्य रवींद्र कडूस, जीवन हारदे, ऐश्वर्य मैड, नितीन साळवे, भूषण कडूस, डॉ. श्रीकांत देशपांडे, महेश कडूस, सुखदेव कडूस, साजन कडूस, विजय राहिंज, स्वामी धामणे, नानासाहेब पारधे, बब्बू इनामदार, सुभाष धामणे, श्यामराव कडूस, सागर कडूस ही मंडळी स्वयंसेवक म्हणून रुग्णसेवा करीत आहेत.

Web Title: 'Three T pattern' for corona deportation in Sarola Kasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.