शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 06:50 AM2019-06-07T06:50:03+5:302019-06-07T06:50:09+5:30

पारनेरच्या ढवळपुरीतील दुर्घटना : दोर तुटल्याने बुडाले; गाव कडकडीत बंद

Three children die drowning in farmland | शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

Next

पारनेर : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा करूण अंत झाल्याची दुर्घटना गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे घडली. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ढवळपुरी येथे वनकुटे रस्त्यावर पुण्यात राहणाºया एका डॉक्टरचे सुमारे दीड एकर शेततळे आहे. टँकर चालक म्हणून काम करणारे गावातील नूर महंमद शेख हे दुपारी तीनच्या सुमारास या शेततळ्यात आपला स्वत:चा मुलगा नावेद याच्यासह अन्य दोन मुलांना घेऊन गेले होते. नूरमहंमद काळू धरण परिसरातील शेततळ्यातून टँकर भरून परिसरातील जनावरांच्या छावण्यांना पाणी पुरवठा करीत होते. ते टँकर भरीत असताना हे तिघे पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने व शेततळ्यात कोणताही आधार न मिळाल्याने हे तिघे बुडू लागले. त्यांनी शेततळ्यातील एक दोर पकडण्याचा प्रयत्न केला. पण दोर तुटल्याने घसरून ते पाण्यात बुडाले. ते बुडत असल्याचे लक्षात येताच नूरमहंमद यांनी त्यांना वर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्लास्टिक कागद असल्याने पुन्हा घसरून तळ्यात पडल्याने नूरमहंमद यांचे प्रयत्न अपयशी ठरून तिघेही बुडून मरण पावले. त्यांनी गावात घटनेची माहिती दिल्यानंतर गावकºयांनी शेततळ्याकडे धाव घेतली. ग्रामस्थ व युवकांनी तिघांना तळ्यातून बाहेर काढून ढवळपुरीच्या खासगी रूग्णालयात नेले. तेथून या तिघांना अहमदनगरला हलविण्यास सांगितले. अहमदनगरकडे नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. राजेश भनगडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गावातील व्यवहार बंद
ढवळपुरीत तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समजताच गावावर शोककळा पसरली. गावातील व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेऊन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. 

मृतांची नावे
 इस्माईल बालम शेख (वय २०), नावेद नूरमहंमद शेख (वय १५), मोईन निजाम शेख (वय १४). यातील मोईन हा आठवीत, नावेद दहावीत तर इस्माईल हा तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत होता.

Web Title: Three children die drowning in farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.