रुणाल जरे व त्यांच्या अंगरक्षकाकडून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:10+5:302021-07-30T04:23:10+5:30

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून काल फिर्यादी गटाच्या वतीने रेखा जरे यांचे ...

Threats from Runal Jare and his bodyguards | रुणाल जरे व त्यांच्या अंगरक्षकाकडून धमकी

रुणाल जरे व त्यांच्या अंगरक्षकाकडून धमकी

Next

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून काल फिर्यादी गटाच्या वतीने रेखा जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी आरोपी बाळ बोठे याची पत्नी सविता बोठे हिच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी सविता बोठे यांनी रुणाल जरे व त्याच्या अंगरक्षकाने धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

सविता बोठे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, माझा मुलगा व मी २७ जुलै रोजी पारनेर दुय्यम कारागृहात पती बाळासाहेब बोठे यांना भेटण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन गेले असता, तेथे या प्रकरणातील फिर्यादीचा नातू रुणाल जरे व त्याचा अंगरक्षक आला होता. त्यांनी मला व माझ्या मुलाकडे रागाने पाहून बघून घेऊ, अशी धमकी दिली. आमचे कोणी काय वाकडे करू शकत नाही. तुझ्या व तुझ्या घरच्यांवर खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली. याबाबत आपण पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकावे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले असता, त्यांनीही आपले म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट आरोपींना जर सर्व सुविधा मिळू शकतात. मग आमचे पोलीस कोठेही जाऊ शकतात. आमचे कोणीच काही वाईट करू शकत नाही, असे म्हणत मला बाहेर जाण्यास सांगितले. या सर्व प्रकाराचा मला व मुलाला मानसिक त्रास झाला आहे. आम्हाला रुणाल जरे व त्याच्या अंगरक्षकाकडून धोका आहे. तसेच रुणालने माझ्याविरोधात खोटे निवेदन दिले आहे. या प्रकरणी रुणाल जरे व तसेच माझी नार्को चाचणी करून खरे काय ते समोर आणावे, असे सविता बोठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

--------------

रुणाल जरे व त्यांचा पोलीस अंगरक्षक पारनेरला आले असता, पाणी पिण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होेते. याव्यतिरिक्त येथे दुसरा काहीही प्रकार झालेला नाही. आमच्याविरोधात कोणी काही आरोप करत असेल तर त्याला काय करणार?

- नितीनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक, पारनेर

Web Title: Threats from Runal Jare and his bodyguards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.