नेवाशाच्या तेरा गावांनी एकजुटीतून हद्दपार केला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:12+5:302021-05-17T04:20:12+5:30

नेवासा : तालुक्यातील १३१ पैकी १३ गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मागील पंधरा दिवसांपासून शून्यावर आहे. या गावकऱ्यांनी एकजुटीतून कोरोनाला ...

Thirteen villages in Nevasa were expelled from Corona in unison | नेवाशाच्या तेरा गावांनी एकजुटीतून हद्दपार केला कोरोना

नेवाशाच्या तेरा गावांनी एकजुटीतून हद्दपार केला कोरोना

Next

नेवासा : तालुक्यातील १३१ पैकी १३ गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मागील पंधरा दिवसांपासून शून्यावर आहे. या गावकऱ्यांनी एकजुटीतून कोरोनाला गावातून हद्दपार केले. तालुक्यातील ९१ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच तालुक्यातील रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. ११८ हून अधिक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला. मागील दीड महिन्यांपासून तालुक्यातील बोरगाव, चिंचबन, इमामपूर, वाशीम, म्हाळापूर, मडकी या सहा गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. बऱ्हाणपूर, सुरेशनगर, वडुले, फत्तेपूर, जायगुडे आखाडा, बाभूळवेढा, मुरमे या सात गावांची रूग्ण संख्या मागील पंधरा दिवसात शून्यावर आहे. वरील तेरा गावांनी एकजुटीतून कोरोनाला गावातून हद्दपार केले. त्याचप्रमाणे लेकुरवाळी आखाडा, बेल्हेकरवाडी, कारेगाव, कांगोनी, नागापूर, खलालपिंप्री, मक्तापूर, रामडोह, सुरेगाव, गोणेगाव, धामोरी, सुकळी खुर्द, नांदूर शिकारी ही गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत.

मागील दीड महिन्यात ५ हजार ७८० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. रूग्णसंख्या ९ हजार ३३४ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ९१ टक्के असून ८ हजार ४७० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ११२ व्यक्तींनी कोरोनामुळे प्राण गमावला. सध्या ७५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नेवासा खुर्द, भेंडा बुद्रूक, घोडेगाव, सोनई, मुकींदपूर, नेवासा बुद्रूक येथे सातत्याने रूग्ण वाढ होत आहे. त्यातील नेवासा खुर्द व मुकींदपूर येथे सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे.

--

३२ हजार नागरिकांचे लसीकरण

तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय येथे लसीकरण सुरू असून ३२ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यामध्ये साठ वर्षांपुढील नागरिक : १४ हजार ९२५,

४५ ते ५९ वर्ष : ११ हजार ६१४, १८ ते ४४ वर्ष : ४२१, आरोग्य विभाग कर्मचारी : २ हजार ८९८, फ्रंट लाइन वर्कर : २ हजार २६०, एकूण : ३२ हजार ११८.

---

आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमधील मडकी गावात मागील दीड महिन्यांपासून व मुरमे गावात मागील पंधरा दिवसात एकही रूग्ण आढळून आला नाही. खलालपिंप्री येथे दोन रूग्ण आढळून आले असून गावामध्ये सर्व प्रकारच्या उपाययोजनांसह जनजागृती सुरू आहे. ग्रामस्थही लसीकरण करत असल्याने लवकरच गाव कोरोनामुक्त होईल.

-कविता साबळे

सरपंच, मुरमे ग्रामपंचायत

---

गावातील ग्रामस्थांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. गावात निर्जंतुक फवारणी करण्यात आली आहे. तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन होत असल्याने मागील दीड महिन्यापासून गावातील एकही ग्रामस्थ कोरोना बाधित झाला नाही.

-विठ्ठल शिंदे,

सरपंच, चिंचबन

----

रूग्णवाढ होत असलेल्या गावांमध्ये शिबिरे घेऊन कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय येथे लसीकरण सुरू आहे. तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

- डॉ. अभिराज सूर्यवंशी,

तालुका आरोग्य अधिकारी, नेवासा

Web Title: Thirteen villages in Nevasa were expelled from Corona in unison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.