शहरासाठी रेमडेसिविरचा तुटवडा भासणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:45+5:302021-04-12T04:19:45+5:30

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर शहरासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आमदार रोहित पवार ...

There will be no shortage of remedicivir for the city | शहरासाठी रेमडेसिविरचा तुटवडा भासणार नाही

शहरासाठी रेमडेसिविरचा तुटवडा भासणार नाही

Next

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर शहरासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आमदार रोहित पवार यांनी हे इंजेक्शन दिले असून, त्यांनीही औषधांचा तुटवडा निर्माण होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्याकडून यापुढील काळात औषधे उपलब्ध होतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगरकरांसाठी औषधांचा तुटवडा होणार नाही, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

रेमडेसिविरच्या इंजेक्शनने भरलेला बॉक्स जगताप यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रभर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. देशाचे नेते शरद पवार यांनी मागील काळातही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले होते. मागील तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. या वेळी नगर शहरामधील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पवार यांच्याशी फोनवरून संपर्क केला. त्यांनी तातडीने नगरसाठी रेमडेसिविरचे इंजेक्शन आमदार रोहित पवार यांच्यामार्फत पाठविल्याचे जगताप म्हणाले.

....

आरोग्यमंत्र्यांना रोज अहवाल

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा दररोज आढावा घेऊन अहवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात येत आहे. आपण स्वत: आरोग्यमंत्र्यांच्या संपर्कात असून, त्यांनीही औषधे कमी पडू देणार नाही, असे सांगितले आहे, असे जगताप म्हणाले.

Web Title: There will be no shortage of remedicivir for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.