शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

फुकट काही मिळत नाही, परिश्रम वाया जात नाही-तेजस्वी सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 6:45 PM

आजच्या युवकांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक न्याय व सामाजिक समतेच्या माध्यमातून देशाची उन्नती साधायला हवी. परिश्रम वाया जात नाही, फुकटचे काही मिळत नाही, कष्टाशिवाय समाधान नाही याची जाणीव युवकांमध्ये क्रांतीची बिजे पेरू शकतात. त्या ध्येयाने तरूणांनी वाटचाल करावी, असा सल्ला सातारा येथील पोलीस अधीक्षक व मूळच्या पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तेजस्वी सातपुते यांनी दिला.

शेवगाव : आजच्या युवकांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक न्याय व सामाजिक समतेच्या माध्यमातून देशाची उन्नती साधायला हवी. परिश्रम वाया जात नाही, फुकटचे काही मिळत नाही, कष्टाशिवाय समाधान नाही याची जाणीव युवकांमध्ये क्रांतीची बिजे पेरू शकतात. त्या ध्येयाने तरूणांनी वाटचाल करावी, असा सल्ला सातारा येथील पोलीस अधीक्षक व मूळच्या पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तेजस्वी सातपुते यांनी दिला.युवा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी युवकांना काही कानगोष्टी सांगितल्या. समाजामध्ये जे उच्च शिखरावर पोहोचले त्यांचा पाया कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सकारात्मकतेचे संस्कार यावर आधारित होता. आजच्या युवकांना फास्ट फूड व फास्ट नॉलेज याची इतकी सवय लागली आहे की यातील योग्य व अयोग्य काय याचे स्पष्टीकरण करता येत नाही. शरीर, बुद्धी व मन यांचा समतोल विकास साधताना स्वामी विवेकानंदांप्रमाणे जगण्याची तयारी हवी.  मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे बहुसंख्य तरुणांची स्थिती मनोरुग्णासारखी झाली आहे. कुटुंब, समाज व भावनिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून परकियांचे आक्रमण थोपवणारी देशव्यापी यंत्रणा तरूणांकडून उभी रहायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकीकडे समाजात महिला असुरक्षित आहेत, तर दुस-या बाजूने आम्ही स्री-पुरुष समानतेचे गोडवे गातो, ही असमानता दूर व्हायला हवी. आजच्या युवकांकडे उद्याच्या शक्तिमान भारताचे आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. जागतिक महासत्ता होण्याची देशाची सिद्धता पाहता युवकांनी यासाठी मनाने सिद्ध व्हायला हवे. प्रशासनाच्या माध्यमातून देशाची गाडी अचूकपणे ओढणारी पिढी प्रभावीपणे पुढे यायला हवी. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी न्यूनगंड व अपराधीपणाची भावना दूर सारावी. माझी पार्श्वभूमी ग्रामीण असूनही ध्येय निश्चित करून परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर मी पोलीस खात्यातील वरिष्ठपद मिळवू शकले, असे त्या अभिमानाने म्हणाल्या. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसinterviewमुलाखत