तपोवन रोड निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:43+5:302021-04-12T04:19:43+5:30

.... पोलिसांच्या भीतीने नागरिक घरात अहमदनगर : सावेडी उपनगरांत पोलिसांनी रविवारी दिवसभर खडा पहारा दिला. तसेच पोलिसांची वाहनेही फिरत ...

Tapovan Road uninhabited | तपोवन रोड निर्मनुष्य

तपोवन रोड निर्मनुष्य

Next

....

पोलिसांच्या भीतीने नागरिक घरात

अहमदनगर : सावेडी उपनगरांत पोलिसांनी रविवारी दिवसभर खडा पहारा दिला. तसेच पोलिसांची वाहनेही फिरत होती. त्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले नाहीत. नागरिकांनी रविवारची सुट्टी घरीच कुटुंबासोबत एन्जॉय केली.

....

तपासणीसाठी पाच पथके

अहमदनगर : शहर व परिसरातील रुग्णालयांतील बेड, ऑक्सिजन, आरोग्याच्या सुविधा आदींची तपासणी करण्यासाठी महापालिकेने पाच पथके तैनात केली आहेत. हे कर्मचारी प्रत्येक रुग्णालयात जाऊन माहिती घेणार आहेत.

...

नागरिकांसाठी मनपा कोविड कक्ष

अहमदनगर : कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी शहरात बेड उपलब्ध होत नाही. बेड कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहज उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

.....

परीक्षा ऑनलाईन

अहमदनर : मुक्त विद्यापीठाने कृषी पदविका व पदवीच्या अंतर्गत परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा अंतर्गत परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयांकडून जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

..

Web Title: Tapovan Road uninhabited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.