बल्लाळांच्या पदावनतीला दिलेली स्थगिती उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:04+5:302021-07-31T04:23:04+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या नगररचना विभागातील के. वाय. बल्लाळ यांच्या पदावनत करण्याच्या कार्यवाहीला दिलेली स्थगिती नगरविकास खात्याने उठविली आहे. तसेच ...

The suspension of Ballal's demotion was lifted | बल्लाळांच्या पदावनतीला दिलेली स्थगिती उठविली

बल्लाळांच्या पदावनतीला दिलेली स्थगिती उठविली

Next

अहमदनगर : महापालिकेच्या नगररचना विभागातील के. वाय. बल्लाळ यांच्या पदावनत करण्याच्या कार्यवाहीला दिलेली स्थगिती नगरविकास खात्याने उठविली आहे. तसेच सहा महिन्यांत कार्यवाही न केल्याने आयुक्त शंकर गोरे यांना खुलासा मागविला आहे. तसे पत्र महापालिकेला शुक्रवारी प्राप्त झाले.

नगरचना विभागातील के. वाय. बल्लाळ यांना दिलेल्या पदोन्नती प्रकरणावरून आयुक्त शंकर गोरे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. बल्लाळ यांना बेकायदेशीरीत्या पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यांना पदावनत करण्याचा आदेश नगरविकासकडून महापालिकेला देण्यात आला होता. या निर्णयाविरोधात बल्लाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. सुनावणी होऊन मंत्री तनपुरे यांनी बल्लाळ यांच्या पदावनत करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली. याबाबत वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचा आदेश आयुक्त गोरे यांना दिला होता. परंतु, आयुक्त गोरे यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. पंधरा दिवसांपूर्वी बल्लाळ यांच्या बाजूने अहवाल नगरविकास खात्याला पाठविला होता. तो नगरविकास खात्याने अमान्य केला असून, बल्लाळ यांच्या पदावनतीच्या कार्यवाहीला दिलेली स्थगिती उठविली. तसेच बल्लाळ यांच्या पदावनतीबाबत सहा महिन्यांत कार्यवाही का केली नाही, याबाबतचा खुलासा सादर करण्याचा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.

....

बल्लाळांची पाठराखण आयुक्तांच्या अंगलट

नगररचना विभागातील बल्लाळ यांची पाठराखण करत आयुक्त गोरे यांनी तसा अहवाल नगरविकासला पाठविला होता. सहा महिने गोरे यांनी बल्लाळ यांच्या पदावनतीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. अहवाल पाठविण्यासही विलंब केला. त्यात त्यांनी दिलेला अहवालही नगरविकास खात्याने अमान्य केला असून, बल्लाळ यांची पाठराखण करणे गोरे यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.

Web Title: The suspension of Ballal's demotion was lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.