शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:55 PM2020-02-04T12:55:23+5:302020-02-04T12:56:16+5:30

गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. 

Students get poor food at Government Tribal Hostel; children's food movement started | शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

Next

संगमनेर : गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. 
सोमवारपासून (दि.३) आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान मंगळवारी (दि.४) सकाळी ९ वाजत राजूर येथील प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे हे मुलांशी चर्चा करण्यासाठी वसतीगृहात आले. मात्र संतप्त झालेल्या मुलांनी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास नकार दिला. मुलांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने ठुबे निघून गेले.  घुलेवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह आहे. जेवण तयार करणाºया ठेकेदारावर कारवाई व्हावी. वसतीगृह प्रभारी गृहपाल दिलीप गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता ही मागणी मुलांनी यापूर्वी केली होती. सोमवारी जेवण तयार केले होते. पण विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच अन्न घेण्यास नकार दिल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. छात्रभारती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Web Title: Students get poor food at Government Tribal Hostel; children's food movement started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.