कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेस शानदार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 09:13 PM2017-12-28T21:13:33+5:302017-12-28T21:23:15+5:30

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथील गोदड महाराज क्रीडानगरीत गुरुवारी शानदार प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यांनी ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन केले.

The state-level Chhatrapati Shivaji Maharaj Kabaddi competition in Karjat is a great start | कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेस शानदार प्रारंभ

कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेस शानदार प्रारंभ

Next
ठळक मुद्देकबड्डीचा थरार राज्यातील ३२ संघाचा सहभाग

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथील गोदड महाराज क्रीडानगरीत गुरुवारी शानदार प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यांनी ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन केले. यावेळी आमदार भीमराव धोंडे उपस्थित होते. राज्य शासनाचा क्रीडा व युवक कल्याण विभाग, राज्य कबड्डी असोसिएशन, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.


उदघाटन समारंभावेळी सहभागी खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन केले. नायगावच्या ढोलपथककांनी ढोलवादन सादर केले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी १६ संघांचे साडेतीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सुरुवातीला फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये पालकमंत्री शिंदे विराजमान झाले होते. त्यानंतर शहराचे प्रथम नागरिक नामदेव राऊत आणि इतर मान्यवर सजवलेल्या ट्रौलीमध्ये सहभागी झाले. विविध वेशभूषेत असलेली शालेय मुले, त्यानंतर महिलांचे ढोल-ताशा पथकाने वेधून घेतले. लेझीम पथकांच्या तालावर कर्जतकरांनी ताल धरला. पोलीसांच्या बैन्डने वातावरणात नवा जोष संचारला. शहराच्या विविध भागातून हे संचलन होत असताना शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. श्री सदगुरु गोदड महाराज क्रीडानगरी अक्षरश: क्रीडाप्रेमींनी फुलून गेली. सायंकाळी प्रकाश झोतात सामने होणार असले तरी दुपारपासूनच क्रीडाप्रेमींची पावले स्पर्धास्थळाकडे वळत होती. संपूर्ण प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती.
यावेळी आमदार भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, सभापती पुष्पाताई शेळके, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी दत्ताभाऊ पाथ्रीकर, संभाजीराव पाटील, बाबूराव चांदेरे, पुंडलीक शेजवळ, सुनील जाधव, राजेंद्र फाळके, शांताराम जाधव, मोहन भावसार, विजय पाथ्रीकर, रमेश भेंडगिरी, भारत गाढवे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, आस्वाद पाटील, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, राजेंद्र फाळके, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानचे सुभाष तनपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, क्रीडा अधिकारी खुरंगे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्याकडून विजेत्या संघास १ लाख ११ हजार तर उपविजेत्यास ५१ हजार रुपये
सरकारच्या वतीने विजेत्या संघास रोख पुरस्कार दिले जातात मात्र स्थानिक आमंदारांनीही रोख पुरस्कार द्यावे, अशी इच्छा आमदार भिमराव धोंडे यांनी व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी केली. आगामी कालावधीत कर्जत तालुक्याचा खेळाडू राज्याचे आणि देशाचे नेत्रूत्व करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा विकासाला वेग देणारी व युवा खेळाडूंसाठी ही प्रोत्साहन देणारी स्पर्धा ठरणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.



 

Web Title: The state-level Chhatrapati Shivaji Maharaj Kabaddi competition in Karjat is a great start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.