अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 03:17 PM2021-02-20T15:17:03+5:302021-02-20T15:19:24+5:30

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार संचालकांच्या जागेसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. मतदान उत्स्फूर्तपणे होत होते.

Spontaneous voting for Ahmednagar District Co-operative Bank | अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

googlenewsNext

   अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार संचालकांच्या जागेसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. मतदान उत्स्फूर्तपणे होत होते.
 
विकास सोसायटी मतदार संघासाठी नगर, पारनेर,  कर्जत  येथे मतदान आहे. तर बिगर शेती मतदार संघातून जिल्ह्यातून मतदान होत  आहे. दुपारी २ वाजेपर्यंत संगमनेर केंद्रावर ९६, पाथडीर्त १००टक्के, राहात्यात ८९.९२, कोपरगाव ९४.५०, श्रीगोंदा ८६ टक्के मतदान झाले. 

  पारनेरला बिगरशेतीमधून ७९ पैकी ६१ तर पारनेर विकास सोसायटीमधून १०५ पैकी ७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कर्जतला विकास सोसायटीमधून ७४ पैकी ७३ जणांनी मतदान केले होते. तर बिगर कृषीसाठी ६४ पैकी ५७ जणांनी मतदान केेले होते. राहुरीत १०२ पैकी ८५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जामखेडला ४८ पैकी ४१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.  

Web Title: Spontaneous voting for Ahmednagar District Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.