जेईई, नीट परिक्षांसाठी परीक्षार्थीसाठी  नगर येथून विशेष रेल्वे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 09:54 PM2020-09-04T21:54:19+5:302020-09-04T21:54:34+5:30

जेईई व नीट परिक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष गाड्या नगरहून सोडण्यात येणार आहेत.

Special train from Nagar for JEE, Neat Examiners | जेईई, नीट परिक्षांसाठी परीक्षार्थीसाठी  नगर येथून विशेष रेल्वे 

जेईई, नीट परिक्षांसाठी परीक्षार्थीसाठी  नगर येथून विशेष रेल्वे 

Next

अहमदनगर: मुंबई व नागपूर येथे होणाऱ्या जेईई व नीट परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांसाठी नगर रेल्वे स्थानकावरून  शनिवार (दि. ५) दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

नागपूरला जाणारी गाडी नंबर 02167 ही रेल्वे दुपारी 4 वजता नगर स्टेशन वरून सुटणार आह. तर मुंबईला जाणारी गाडी नंबर 01132 ही शनिवारी रात्री 9 वाजता नगर रेल्वे स्थानकावरून सुटेल. तसेच मुंबई व नागपूर येथून परत येण्यासाठीही विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असल्याचे स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी यांनी सांगितले


    जेईई व नीट परिक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष गाड्या नगरहून सोडण्यात येणार आहेत. यासठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु झाले आहे. ज्या विद्यार्थांचे तीकीट अरक्षण निश्चीत झाले आहे अशांनाच फक्त गाडीत प्रवेश दिला जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्त्यानी या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Special train from Nagar for JEE, Neat Examiners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.