श्रीगोंद्याच्या विजय पवारने गाजविले खेलो इंडियाच्या कुस्तीचे मैदान, ब्राँझ पदकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:28 PM2020-02-29T12:28:32+5:302020-02-29T12:28:42+5:30

श्रीगोंदा (जि.अहमदनगर): भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या खेलो इंडीया १७ ते २३ वयोगटातील ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी विजय वसंत पवार याने ८७ किलो वजन गटात बाँझ पदक पटकविले. त्यामुळे खेलो इंडीया स्पर्धेत यंदा श्रीगोंदा तालुक्याला तीन पदके मिळाली आहेत. 

Shrigondi's Vijay Pawar dominated Khelo India's wrestling ground, the bronze medal standard. | श्रीगोंद्याच्या विजय पवारने गाजविले खेलो इंडियाच्या कुस्तीचे मैदान, ब्राँझ पदकाचा मानकरी

श्रीगोंद्याच्या विजय पवारने गाजविले खेलो इंडियाच्या कुस्तीचे मैदान, ब्राँझ पदकाचा मानकरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा (जि.अहमदनगर): भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या खेलो इंडीया १७ ते २३ वयोगटातील ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी विजय वसंत पवार याने ८७ किलो वजन गटात बाँझ पदक पटकविले. त्यामुळे खेलो इंडीया स्पर्धेत यंदा श्रीगोंदा तालुक्याला तीन पदके मिळाली आहेत. 
विजय पवार हा येळपणे येथील सेवानिवृत्त मेजर वसंत पवार यांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. पण पवार परिवाराच्या कुस्ती नसानसात भिनली आहे. चुलते बाळासाहेब पवार व बबनराव डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेतले आणि शालेय महाविद्यालयीन जीवनात कुस्तीची अनेक मैदाने गाजविली. चुलते बाळासाहेब पवार याला खेळायची आवड व इच्छाशक्तीच्या बळावर तो खेलो इंडीयाच्या मैदानात यशस्वी झाला आहे.  
खेलो इंडीया महिला कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिक यांनी सुवर्ण पदक तर गणेश बायकर याने वेटलिंफ्टीगमध्ये बॉझ पदक पटकविले. जिद्दी खेळाडूंच्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात श्रीगोंद्याचे नाव उंचावत चालले आहे. येत्या चार वर्षात श्रीगोंद्यातील खेळाडू आॅलपिंक स्पधेर्चे दार उघडणार ही त्याची निशाणी आहे. 
छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सतिश चोरमले यांनी विजय पवारच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयास खेलो इंडीया कुस्ती स्पर्धेत बॉझ पदक मिळवून दिल्याबद्दल  विजय पवार याचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे प्राचार्य एकनाथराव खांदवे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Shrigondi's Vijay Pawar dominated Khelo India's wrestling ground, the bronze medal standard.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.