संगमनेरात पोलिसांची ‘फटकेबाज’ कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:20 AM2021-03-27T04:20:39+5:302021-03-27T04:20:39+5:30

संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरूवारी (दि. २५) जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेर तालुक्यात ...

'Shooting' action of police in Sangamnera | संगमनेरात पोलिसांची ‘फटकेबाज’ कारवाई

संगमनेरात पोलिसांची ‘फटकेबाज’ कारवाई

Next

संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरूवारी (दि. २५) जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १४८ इतके कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने कारवाईचे कडक धोरण हाती घेतले आहे. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलीस फौजफाट्यासह शहरात पायी फिरत कारवाई केली. शहरातील दुकाने, बँका, पतसंस्था, खासगी कार्यालये, हातगाड्या येथे तोंडाला मास्क न लावलेल्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच दुचाकी, चारचाकी वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली.

-----------------

बसेस थांबवून कारवाई

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून विनामास्क प्रवास करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. नाशिक-पुणे महामार्ग, कोल्हार-घोटी राज्यमार्ग येथे बस थांबवून कारवाई करण्यात आली. मास्क न लावल्याने अनेकांना दंडाबरोबरच पोलिसांच्या दंडुक्याचे फटके ही खावे लागले.

------------

प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. नागरिकांनी नियम पाळावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे.

-राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग.

Web Title: 'Shooting' action of police in Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.