कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचा शिर्डीकरांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:29 PM2020-07-28T12:29:24+5:302020-07-28T12:29:53+5:30

शिर्डी : शिर्डीमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाविरपद्धची लढाई जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

Shirdikar's determination to win the battle against Corona | कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचा शिर्डीकरांचा निर्धार

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचा शिर्डीकरांचा निर्धार

googlenewsNext

शिर्डी : शिर्डीमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाविरपद्धची लढाई जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिर्डी आणि परिसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्?या वाढत असल्याने प्रशासनाने अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी टिमवर्कच्या माध्यमातून अधिक कठोर उपाय योजना करा,  कोणतेही सहकार्य मागा ही कोरोनाची लढाई सामुहीक प्रयत्?नांनी आपण यशस्वी करु असा विश्?वास माजीमंत्री आ.राधाकृष्?ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डी राहाता आणि  परिसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आ. विखे पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात महसूल व आरोग्य विभागातील अधिकाºयांची महत्वपूर्ण बैठक घेतली. प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय परिस्थितीचा आढावा आणि सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी वैद्यकीय अधिकाºयांकडून जाणून घेतली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, मुख्याधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतिष दिघे,  राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकरी अंकीत यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख उपस्थित होते.

आपल्या तालुक्यात यापुर्वी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या फार नव्हती. रूग्ण सापडल्या नंतर प्रशासनाने दखल घेवून केलेले काम चांगले झाल्?याने परिस्थिती नियंत्रणात राहीली.  मात्र लॉकडाऊन उठल्यानंतर रुग्णांची वाढलेली संख्या रोखणे हे आता मोठे आव्हान आधिका-यांपुढे आहे. आजपर्यंत आधिकाºयांनी टिम वर्क म्हणून केलेल्या कामांमुळे रुग्णांची संख्या आपल्याकडे वाढली नाही ही समाधानकारक बाब आहे. याबद्दल सर्व महसूल  अधिकारी आणि वैद्यकीय अधिकार्यांचे अभिनंदन करून आ.विखे म्हणाले की, आजपर्यंत २१४ रुग्ण आपल्?या तालुक्?यात आढळून आले आहे. यापैकी १५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७१ टक्के असुन, ६० रुग्णांवर उपचार सुरु असल्याकडे लक्ष वेधले.

भविष्यातही आधिका-यांनी असेच टिमवर्क करून या भागातील रुग्णांची संख्या आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या लढाईत मी तुमच्या बरोबर आहेच. प्रशासनाला कोणतेही सहकार्य देण्याची माझी तयारी असल्?याचे त्?यांनी आधिका-यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या आता वाढू द्यायची नाही या निधार्राने आपल्या सवार्ना काम करावे लागेल. नागरीकांना दिलासा देण्यासाठी केलेल्या सामुहीक प्रयत्नात आपल्या सवार्नाच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत सादर केला.

Web Title: Shirdikar's determination to win the battle against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.