शिंदे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:21 AM2021-07-26T04:21:38+5:302021-07-26T04:21:38+5:30

--------------- नेत्र शिबिराला प्रतिसाद अहमदनगर : मिसगर डायग्नॉस्टिक सेंटर व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी मोफत नेत्र तपासणी ...

Shinde felicitated by the villagers | शिंदे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार

शिंदे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार

Next

---------------

नेत्र शिबिराला प्रतिसाद

अहमदनगर : मिसगर डायग्नॉस्टिक सेंटर व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर झाले. याप्रसंगी रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मिसगर ट्रस्टचे इम्रान शफी अहमद शेख, इम्रान जमिर खान, फरहान खालीद खान, नविद आरिफ तांबटकर, बहिरनाथ वाकळे, प्रा.महेबूब सय्यद, अभिजीत वाघ, संध्या मेढे, रुग्णमित्र नादीर खान, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये १९२ रुग्णांची तपासणी किरण कवडे, महेश भोसले, ओंकार वाघमारे यांनी केले, तर ६२ रुग्णांवर आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. चश्म्याचे नंबर तनवीर चश्मावाला व अल्ताफ शेख यांनी तपासणी करून अल्पदरात चश्मे दिले.

-------------

नवोदय विद्यालयाची निवड चाचणी

टाकळी ढोकेश्‍वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सहावीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. पूर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थावरून डाऊनलोड करावे, तसेच प्रवेशपत्रावर दिलेल्या केंद्राव्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही, याची सर्व पालक-विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

----------------

योगवर्गचा समारोप

अहमदनगर : सिद्धीबाग येथील योग विद्या धामच्या वतीने घेण्यात आलेल्या एक महिना योगवर्गाचा समारोप गुरुवारी झाला. याप्रसंगी योग शिक्षक हेमंत आयचित्ते, योगशिक्षिका कल्पना भामरे, हरिभाऊ डोळसे, निरंजन घोडके, अरविंद देऊदकर, महेश तामटे, शुभम मुदंडा, गोविंद मुंदडा, श्रीनिवास पांडव, तृप्ती मुथियान, सोनाली वायकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन घोडके यांनी केले, तर सोनाली वायकर यांनी आभार मानले. यावेळी योग साधक उपस्थित होते.

Web Title: Shinde felicitated by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.