शेवगावकर पितात पिवळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:01 PM2017-08-11T16:01:14+5:302017-08-11T16:02:38+5:30

Shevgavakar drink yellow water | शेवगावकर पितात पिवळे पाणी

शेवगावकर पितात पिवळे पाणी

Next
ठळक मुद्देगोदावरी नदीतून जायकवाडी जलाशयात सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे.योजनेच्या जॅकवेल भोवती शेवाळ तसेच सडलेल्या पाला पाचोळ्याचा थर जमा होतो.याच कारणाने अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरु आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून गेल्या दोन दिवसांपासून पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरु आहे़ त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पिवळसर पाणी पिण्याची वेळ आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवसात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे़
शेवगाव, पाथर्डी या दोन तालुक्याच्या गावासह योजनेवरील सर्व ५४ गावात दुर्गंधीयुक्त पिवळसर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलजन्य आजाराच्या भीतीने जनतेला विकतचे पाणी घ्यावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मन्सूर फारूकी, नगरसेवक शब्बीर शेख, अजय भारस्कर, भाऊसाहेब कोल्हे, उपअभियंता सानप आदींनी पाणी योजनेच्या शहरातील खंडोबामाळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली़. गोदावरी नदीतून जायकवाडी जलाशयात सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यातून योजनेच्या जॅकवेल भोवती शेवाळ तसेच सडलेल्या पाला पाचोळ्याचा थर जमा होतो. पावसाळ्यात प्रत्येक वर्षी अशुद्ध पाण्याची ओरड होते. यंदाही याच कारणाने अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरु आहेत़ पिण्याच्या पाण्याचा उग्र दर्प कमी व्हावा, यासाठी क्लोरीन, टीसीएल, तुरटी आदी रसायनांची मात्रा वाढविण्याच्या तसेच साथींच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाभार्थी नागरिकांनी तूर्त पाणी उकळून प्यावे, अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.  

Web Title: Shevgavakar drink yellow water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.