शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

 संत निंबराज पालखी सोहळा : संततधार पावसात वैष्णवांचा मेळा मार्गस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 4:31 PM

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील हजारो भाविक वारकरी संततधार पावसात संत निंबराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील हजारो भाविक वारकरी संततधार पावसात संत निंबराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.      ज्ञानोबा - तुकोबाच्या जयघोषात तल्लीन होऊन देहभान विसरून नाचणारे वैष्णव, टाळ मृदुंगाचा गजर, विद्याधाम प्रशालेच्या विद्याथीर्नींचे लेझीम पथक, पावसाच्या सरी अशा भाक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त असणा-या संत निंबराज महाराजांचा ३५६ वा पालखी सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.आषाढी वारीचे वेध लागलेल्या भाविकांमुळे सकाळपासूनच हरीगजराने मंदीर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प चंद्रकांत दंडवते यांच्या हस्ते विणापूजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मंदीराबाहेर आणली.यावेळी देवदैठण, येवती, पाडळी, ढवळगाव, तडोर्बावाडी, गोलेगाव, शिरूर, बाभूळसर येथील वारकरी सहभागी झाले आहेत. वीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर पालखी पंढरपूरमध्ये पोहचते. पंढरपूरला काल्याच्या किर्तनाचा मान संत निंबराज पालखीचा असल्यामुळे गोपाळपूर येथे काल्याचे किर्तनाने सोहळ्याची सांगता होते, अशी माहिती देवस्थानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दंडवते, सुरेश लोखंडे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा