शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

प्रेमातून फुलली समाजसेवेची ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 4:51 PM

आधी कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे डॉ. दिलीप आणि सुचेता यांचे न कळत एकमेकांवर प्रेम जडले. मनातलं प्रेम त्यांच्या शिक्षणाच्या आड आलं नाही. शिक्षण पूर्ण होताच हे प्रेम विवाहबंधनात अडकलं आणि कायमचं नात झालं.

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /भाऊसाहेब येवले /आधी कॉलेजमध्ये एकत्र शिकणारे डॉ. दिलीप आणि सुचेता यांचे न कळत एकमेकांवर प्रेम जडले. मनातलं प्रेम त्यांच्या शिक्षणाच्या आड आलं नाही. शिक्षण पूर्ण होताच हे प्रेम विवाहबंधनात अडकलं आणि कायमचं नात झालं. नात्यांच्या या संजीवनीला समाजसेवेचा वसा लाभला आहे. ही कथा आहे राहुरी येथील डॉ. दिलीप कुलकर्णी व सुचेता कुलकर्णी यांची.संजीवनी हॉस्पिटल म्हटले की डॉ़ दिलीप कुलकर्णी व सुचेता कुलकर्णी यांचे नाव ओघाने डोळ््यासमोर येते़ दोघांचाही मूळ पिंड समाजसेवेचा. सुचेता यशवंत कुलकर्णी या सातारा येथे सायन्स कॉलेजला दुस-या वर्षाला होत्या. भाऊ संजय यांच्याकडे मित्र म्हणून डॉ़ दिलीप कुलकर्णी हे येत असत. त्यामुळे कॉलेज जीवनापासून दोघांची ओळख होती.शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विषय दोघांच्याही मनात नव्हता. सुचेता या एमएसस्सीनंतर सांगली येथील विलींग्डन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. डॉ़ कुलकर्णी हे राहुरी येथील नगर परिषदेच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय आधिकारी म्हणून रूजू झाले. लग्नापूर्वी ओळख असल्याने दोघांनाही एकमेकांचा स्वभाव माहित होता. सुचेता या हट्टी स्वभावाच्या होत्या. सोने, कपडे खरेदी करणे यापेक्षा त्यांना वाचन, संगीत याची आवड होती. पुस्तक वाचण्याचे ठरविले तर रात्रीतून वाचून काढीत असत. लग्नानंतर स्वत:चे हॉस्पिटल असावे असे कुलकर्णी दाम्पत्याला वाटत होते. त्यानुसार राहुरी येथे संजीवनी हॉस्पिटलची उभारणी केली. डॉक्टरांचा स्वभाव हसतमुख व आनंदाने वैद्यकीय व्यवसाय करणे असा आहे. सुचेता यांना नवीन विषय शिकण्याची आवड आहे. संकट आले तर त्यावर मात करीत एकमेकांसह कुटुंबाला सावरून घेण्याचे कसब कुलकर्णी दाम्पत्यामध्ये आहे. मुलगा डॉ़ ऋषिकेश यांच्यावर चांगले संस्कार करण्यात आले. सून डॉ़ स्नेहा ही देखील डॉक्टर आहे. दोघेही पुणे येथे वैद्यकीय व्यवसाय यशस्वीपणे करीत आहे. सुचेता व दिलीप कुलकर्णी या दोघांचाही स्वभाव सारखाच आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात भांडणाचे प्रसंग आले नाही.  वर्षभर आनंदी राहत आलेले काम करीत राहणे यालाच व्हॅलेंटाईन डे असे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट