केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:03 PM2018-04-12T17:03:26+5:302018-04-12T17:12:05+5:30

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

Sangram Jagtap's police custody extended in Kedgah double murder case | केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ

Next
ठळक मुद्दे१६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय अन्य चार आरोपीच्या पोलीस कोठडीतही १६ एप्रिलपर्यत वाढ करण्यात आली आहे. 

दुहेरी हत्याकांडप्रकरणी जगताप यांच्यासह संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर उर्फ बीएम, बाळासाहेब एकनाथ कोतकर अटकेत असून आणखी एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज आमदार जगताप यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलीसांनी न्यायालयात हजर केले होते.  या हत्याकांडप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 
 

 

Web Title: Sangram Jagtap's police custody extended in Kedgah double murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.