संगमनेर नगरपालिका : शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:45 PM2019-01-23T12:45:00+5:302019-01-23T12:45:37+5:30

संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर त्यांचे सदस्यपद भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आले आहे

Sangamner Municipality: Canceling the post of Shiv Sena corporator | संगमनेर नगरपालिका : शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द

संगमनेर नगरपालिका : शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द

Next

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर त्यांचे सदस्यपद भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी (१९ जानेवारी) आदेश पारीत केला आहे.
संगमनेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ ला झाली होती. या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. १० (अ) म्हणून लखन सुधाकर घोरपडे विजयी झाले होते. मात्र, त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी २७ जुलै २०१७ ला तसा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता.
त्यानुसार घोरपडे यांचा अनुसूचित जातीचा दावा अमान्य करीत त्यांना उपविभागीय अधिकाºयांनी दिलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. तसेच घोरपडे यांचे मूळप्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आल्याने त्याआधारे घेतलेले लाभ काढून घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सक्षम अधिकारी यांना निर्देशित केले होते.

Web Title: Sangamner Municipality: Canceling the post of Shiv Sena corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.