वाळू तस्करांना दणका : दोन कोटींचा मुद्देमाल जप्त,  पाच जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:48 PM2021-03-30T13:48:50+5:302021-03-30T13:51:06+5:30

कारवाईत जेसीबी व पोकलेन मशीनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Sand smugglers hit: Rs 2 crore seized, five arrested | वाळू तस्करांना दणका : दोन कोटींचा मुद्देमाल जप्त,  पाच जण ताब्यात

वाळू तस्करांना दणका : दोन कोटींचा मुद्देमाल जप्त,  पाच जण ताब्यात

googlenewsNext

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथे रात्रीच्या वेळी बेकायदा वाळू उपसा करणा-या तस्करांवर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने रविवारी रात्री कारवाई करण्यात आली. कारवाईत जेसीबी व पोकलेन मशीनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच आरोपींनाही तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आरोपींमध्ये सुनीलकुमार चुरामन महतो (बेरमो, जि.बोकारो, झारखंड), मनजीत धुप्पड (आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (राजोहा, ता.बहरी, मध्यप्रदेश), युवराजसिंग केशरसिंग भंडारी (बागेसर, डेहराडून) व रवी धुप्पड (श्रीरामपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन पोकलेन, एक बुलडोझर, एक ट्रक, दोन जेसीबी व चार ब्रास वाळू, मोबाईल असा एक कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या आदेशानुसार निरीक्षक मधुकर साळवे यांनी कारवाई केली. पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, हवालदार राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, दादासाहेब लोंढे, आबासाहेब गोरे, काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ, सुनील शिंदे यांचा पथकात समावेश होता.

Web Title: Sand smugglers hit: Rs 2 crore seized, five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.