शेवगाव, पाथर्डीतील तीन पुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:03+5:302021-03-07T04:20:03+5:30

शेवगाव : शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेवगाव तालुक्यातील दोन, तर पाथर्डी तालुक्यातील एक अशा आठ कोटी ६६ लाख रुपयांच्या ...

Sanction for three bridges at Shevgaon, Pathardi | शेवगाव, पाथर्डीतील तीन पुलांना मंजुरी

शेवगाव, पाथर्डीतील तीन पुलांना मंजुरी

Next

शेवगाव : शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेवगाव तालुक्यातील दोन, तर पाथर्डी तालुक्यातील एक अशा आठ कोटी ६६ लाख रुपयांच्या पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

मतदारसंघातील तीन पुलांच्या बांधकामासाठी शासनाकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १ मार्च रोजी मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांची मागणी पूर्ण होऊन लवकरच दळणवळण सुखकर होईल, असे राजळे म्हणाल्या. शेवगाव तालुक्यातील वडुले बु. ते लोळेगाव रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पूर्ण झाले आहे. या मार्गावरील वडुले बुद्रुक शिवारातील ढोरा नदीवरील ७० मीटर लांबीच्या पुलाच्या कामासाठी चार कोटी ३९ लक्ष तसेच मुंगी ते पिंगेवाडीदरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असून मुंगी हद्दीतील नंदिनी नदीवरील ६० मीटर लांबीच्या पुलाच्या कामासाठी दोन कोटी ८१ लाख, पाथर्डी तालुक्यातील येळी ते कोळसांगवी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडकअंतर्गत तीन वर्षांपूर्वी झाले. मात्र, कोळसांगवी येथे पुलाची आवश्यकता होती. या पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी ४६ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पुलांची कामे मार्गी लागणार आहेत, असे राजळे यांनी सांगितले.

Web Title: Sanction for three bridges at Shevgaon, Pathardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.