साकळाई पाणी योजना : पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर दीपाली सय्यद यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 04:21 PM2019-08-11T16:21:51+5:302019-08-11T16:26:40+5:30

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण आज मागे घेण्यात आले.

Saklai Water Scheme: Deepali Syed's fast behind after the intervention of Guardian Minister Ram Shinde | साकळाई पाणी योजना : पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर दीपाली सय्यद यांचे उपोषण मागे

साकळाई पाणी योजना : पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर दीपाली सय्यद यांचे उपोषण मागे

googlenewsNext

अहमदनगर : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण आज मागे घेण्यात आले.
पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. यावेळी पूरपरिस्थितीनंतर आपण साकळाईप्रश्नी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. त्यानंतर दीपाली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले.
सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले होते. योजनेस मंजुरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला होता.1 सप्टेंबरपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 2 सप्टेंबरपासून पुन्हा याचठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे.

 

Web Title: Saklai Water Scheme: Deepali Syed's fast behind after the intervention of Guardian Minister Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.