परशाच्या मैत्रीखातर नगरची आर्ची सैराट झाली़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:08 PM2020-05-25T19:08:08+5:302020-05-25T19:08:20+5:30

अहमदनगर: सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या कलाकाराच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पुण्याच्या एका तरूणाने नगर येथील महिलेशी मैत्री करून तिचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची एक सैराट घटना समोर आली आहे. 

For the sake of Parsha's friendship, Archie of the town became Sairat | परशाच्या मैत्रीखातर नगरची आर्ची सैराट झाली़

परशाच्या मैत्रीखातर नगरची आर्ची सैराट झाली़

Next

अहमदनगर: सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या कलाकाराच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पुण्याच्या एका तरूणाने नगर येथील महिलेशी मैत्री करून तिचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची एक सैराट घटना समोर आली आहे. 
सायबर पोलिसांनी  ‘त्या’ बनावट परश्याला बेड्या ठोकल्या आहेत. शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय २५ रा़ मोहन नगर, मंगल आर्केड सोसायटी प्लॉट नं़७ पिंपरी जि़ पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़ चव्हाण याने वर्षभरापूर्वी फेसबुकवर अभिनेता आकाश ठोसर याच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले होते़ या अकाउंटवर नगर येथील एका २५ वर्षीय महिलेने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली़ त्यानंतर दोघांची फेसबुकवर चाटिंग सुरू झाली़ चाटिंगचे रुपांतर मैत्रित झाले़ सैराटमधील परशा आपला मित्र झालाय, या अविर्भावात  नगरची महिलाही त्याच्यासोबत चांगल्याच गप्पा मारू लागली़ डिसेंबर महिन्यात या बनावट परशाने (शिवदर्शन चव्हाण) सांगितले की, माझी आई अजारी असून तिला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे़ पैशांची खूप गरज आहे़ मला पैशांची मदत कऱ परशाचा असा निरोप येताच या महिलेने सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत. मात्र माझ्याजवळ असलेले दागिने तुला देते़ आता दागिने घेण्यासाठी महिलेसमोर गेल्यास चव्हाण याचा भंडाफोड होणार होता. त्यामुळे त्याने एक शक्ल लढविली़ त्याने नगरच्या महिलेला सांगितले की, मला आईला सोडून नगरला येता येणार नाही़ मी दागिने घेण्यासाठी माझ्या एका जवळच्या मित्राला पाठवितो़ मित्र म्हणून परशा बनलेला शिवदर्शन चव्हाण हाच नगरमध्ये आला आणि महिलेकडील पाच तोळ्याचे दागिने घेऊन गेला़ दागिने मिळाल्यानंतर चव्हाण याने त्या महिलेला फेसबुकवरून ब्लॉक करून टाकले़ त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे़, असे या महिलेच्या लक्षात आले़ 
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरिक्षिक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रतिक कोळी, हेड कॉस्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, अरुण सांगळे, भगवान कोंडार, अमोल गायकवाड, वासुदेव शेलार यांच्या पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीला अटक केली. त्या महिलेचे दागिनेही आरोपीकडून हस्तगत केले आहेत़ 
 

Web Title: For the sake of Parsha's friendship, Archie of the town became Sairat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.