शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

संत शेख महमंद महाराज मंदिर बंद; चारशे वर्षात प्रथमच गुढीपाडवा उत्सव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 3:34 PM

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने चंदन लेप व नैवेद्याचा कार्यक्रम असतो. मात्र कोरोना संचारबंदी लागू असल्याने संत शेख महंमद महाराजाचे मंदिर बंद राहिले. चारशे वर्षाच्या कालखंडात मंदिरात प्रथमच गुढीपाडवा उत्सव साजरा झाला नाही.

श्रीगोंदा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने चंदन लेप व नैवेद्याचा कार्यक्रम असतो. मात्र कोरोना संचारबंदी लागू असल्याने संत शेख महंमद महाराजाचे मंदिर बंद राहिले. चारशे वर्षाच्या कालखंडात मंदिरात प्रथमच गुढीपाडवा उत्सव साजरा झाला नाही.संत शेख महंमद महाराज हे छत्रपती शहाजी राजे यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचे गुरु होते. मालोजीराजेंनी संत शेख महंमद महाराजांना श्रीगोंदा येथे मठासाठी जागा जमीन दान दिली होती. संत शेख महंमद यांचे देहावसान झाले. तेव्हापासून श्रीगोंद्यातील सर्वधर्मीय एकत्र येऊन संत शेख महंमद महाराज मंदिरात धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी तेली समाजाला चंदन लेपाचा मान असतो. पाच जण चादर चढवितात. त्यानंतर हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून  नैवेद्य दाखविला जातो भाविक दिवसभर दर्शन घेतात. कोरानामुळे गेल्या पाच सहा दिवसापासून देशातील मंदिर मज्जीद बंद आहेत. या पार्श्वभूमीवर संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर ही बंद ठेवण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चार नागरिक मंदिरात गेले. त्यांनी चंदन लेप केला चादर चढविली  आणि पुन्हा मंदिर बंद करून घेतले. भक्त मंदिराकडे फिरकले नाही. त्यांनी घरुनच संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले. कोरोनाची महामारी संकट लवकर जावो आणि तुमच्या मंदिराचा दरवाजा लवकर उघडा होवो अशी  प्रार्थना केली. कोरोनामुळे मंदिर मज्जीद बंद आहेत. त्यामुळे संत शेख महंमद महाराजांचे मंदिर बंद आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या उत्सव चारशे वर्षाच्या कालखंडात प्रथमच साजरा करता आला नाही, असे यात्रा कमिटीचे सदस्य अशोक आळेकर, ट्रस्टचे अमिन शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा