शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

साईबाबा संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा केली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 6:39 PM

शिर्डी : साईबाबा संस्थानने श्रीराम पार्किंगमध्ये सुरू केलेल्या टाईम दर्शन काउंंटरवर रविवार २६ नोव्हेंबरला एकाच पालखीने आलेल्या १३ हजार साईभक्तांनी गर्दी केल्याने साईभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद करुन साईभक्तांची थेट दर्शन रांगेतून दर्शनाची व्यवस्था केली. दुपारी २.३० वाजता टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू ...

शिर्डी : साईबाबा संस्थानने श्रीराम पार्किंगमध्ये सुरू केलेल्या टाईम दर्शन काउंंटरवर रविवार २६ नोव्हेंबरला एकाच पालखीने आलेल्या १३ हजार साईभक्तांनी गर्दी केल्याने साईभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून संस्थानने टाईम दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद करुन साईभक्तांची थेट दर्शन रांगेतून दर्शनाची व्यवस्था केली. दुपारी २.३० वाजता टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीत सुरू झाल्याचा दावा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केला आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्या साईप्रसादालयाच्या इमारतीत टाईम दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू होती. त्यामुळे मात्र या जागेवर नवीन दर्शन रांगेचे काम सुरू करण्यासाठी इमारत पाडण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरुपात टाईम दर्शनचे काऊंटर श्रीराम पार्किंग, साईउद्यान इमारत आदी ठिकाणी सुरू करण्यात आली. यापैकी श्रीराम पार्किंग येथे गेल्या रविवारी एका पालखीव्दारे आलेल्या १३ हजार पदयात्री भाविकांनी एकाच वेळेस टाईम दर्शन काउंटरवर गर्दी केली. त्यामुळे साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर, पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांनी तातडीने टाईम दर्शन व्यवस्था बंद करुन सर्व भाविकांची थेट दर्शन रांगेतून दर्शनाची व्यवस्था केली. त्यानंतर दुपारी २.३० वाजेपासून टाईम दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. साईभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराजवळ जुन्या प्रसादालयाजवळील साईनिवास अतिथीगृहाजवळ तात्पुरती, पर्यायी टाईम दर्शन पास वितरणाचे काऊंटर तातडीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिल्याचे डॉ. हावरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा