शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शिक्षण हक्क कायदा : नगर जिल्ह्यात पहिलीसाठी ५ हजार २१४ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:19 PM

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.

केडगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक जागांसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.२०१४ पासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने करण्याची कार्यपद्धती सरकारने निश्चित केली आहे. यानुसार नगर जिल्ह्यात मनपा व नगर तालुका अशा दोन तालुक्यांची प्रायोगिक तत्वावर २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. सन २०१६ -२०१७ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक सामाजिक दुर्बल तसेच विधवा,घटस्फोटीत ,अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश घेता येणार आहे. पालकांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांवर मदत केंद्राची स्थापना करून त्यामार्फत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून मदत केंद्रांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.सन २०१८- २०१९ ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पालकांनी दि.७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत आॅनलाईन पद्धतीने आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज भरावे असे आवाहन शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी केले. जिल्ह्यात एकूण ३९५ शाळा पात्र असून पूर्व प्राथमिक वर्गासाठी १६८ जागा रिक्त व प्राथमिक ( पहिली) साठी ५ हजार २१४ जागा रिक्त जागा आॅनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर