शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

परदेशवारी नको पैसे परत द्या; पर्यटकांसाठी सवलती पण कोरोनाची भीती

By अरुण वाघमोडे | Published: September 27, 2020 12:29 PM

एप्रिल ते जून महिन्यात सुट्ट्यांचा कालावधी असल्याने देशभरातील लाखो पर्यटकांनी या काळात आपल्या सहली नियोजित करत पर्यटन कंपन्यांकडे बुकिंग केले होते. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने पर्यटन स्थळे बंद झाली. त्यामुळे पर्यटकांचे पैसे टुरिस्ट कंपन्याकडे अडकून पडले आहेत. आता टुरिस्ट कंपन्यांनी पर्यटकांना रिशेड्युलचा पर्याय दिला आहे. मात्र कोरोनाची भीती कायम असल्याने आता परदेशवारी नको तर पैसे परत द्या, अशी पर्यटकांची मागणी आहे. टुरिस्ट कंपन्यांचे पैसेही विमान कंपन्या, हॉटेल्स, पर्यटन स्थळी असलेल्या व्यावसायिकांकडे अडकून पडले आहेत.

जागतिक पर्यटन दिन विशेष

अहमदनगर : लॉकडाऊननंतर देशांतर्गत व काही विदेशातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. पर्यटन कंपन्यांमार्फत आकर्षक सवलतीही दिल्या जात आहेत. मात्र कोरोनाच्या भितीमुळे यंदा पर्यटक घर सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येण्यास अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे.

मार्चपासून भारतासह जगभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच ठिकाणची बससेवा, रेल्वे, विमानसेवा, हॉटेल व पर्यटन स्थळे बंद झाली होती. यामुळे  कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भारतासह विदेशातील काही पर्यटन स्थळे खुले करण्यात आले आहेत.

 पर्यटन कंपन्यांनी बुकिंग घेण्यासही सुरुवात केली आहे. कोरोनाची भीती कायम असल्याने ग्रुप सहलीसाठी प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये दहा टक्के पर्यटकांनीही बुकिंग केले नसल्याचे पर्यटन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळीही शुकशुकाटजिल्ह्यातील शिर्डी, शिंगणापूर, मेहराबाद यासह इतर धार्मिकस्थळे व भंडारदरा, निघोज या पर्यटनस्थळावरही कोरोना महामारीचा मोठा परिणाम झाला आहे. भाविक व पर्यटक येत नसल्याने येथील आर्थिक उलाढाल गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे.

देशांतर्गत व विदेशातील काही पर्यटनस्थळे खुली झाली आहेत. मात्र सध्या पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यात पर्यटनाशी निगडीत असलेल्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.    - निलेश वैकर, संचालक पूजा इंटरनॅशनल थॉमस कूक

कोरोना महामारीचा पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाची भीती कायम आहे. नोकरी, व्यवसायिक कामानिमित्त लोक देश-विदेशात प्रवास करत आहेत. मात्र ग्रुप सहलीला अजून प्रतिसाद नाही. ही परिस्थिती मात्र येत्या काही दिवसात बदलेल, अशी अपेक्षा आहे.    -किशोर मरकड, अध्यक्ष, टुरिझम फोरम

टॅग्स :ahmedabadअहमदाबादTravel Tipsट्रॅव्हल टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या