क्रोधावर संयम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:22 PM2019-11-10T12:22:19+5:302019-11-10T12:22:54+5:30

जेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते.

Restraint on anger | क्रोधावर संयम ठेवावा

क्रोधावर संयम ठेवावा

googlenewsNext

सन्मतीवाणी
जेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते. तेथेच श्री लक्ष्मीचा वास असतो. क्रोध हा सर्व समस्यांचे मूळ आहे. तो मूळ नष्ट केल्यास सर्व काही सुरुळीत होते. अपेक्षा भंगामुळे क्रोधाची निर्मिती होते. आपल्या गरजा मर्यादित ठेवा. क्रोधावर नियंत्रण ठेवा, नक्कीच सुखी व्हाल. जेव्हा कष्ट करुन अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा क्रोध येतो. क्रोधामुळे एखाद्याचे जीवनच बरबाद होते. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल त्यावेळी क्रोध तयार होतो. ज्यांच्या वाणीत मधुरता आहे, तेथे क्रोध नसतो. 
आज काल जंक फुड, फास्ट फुड यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे  अ‍ॅसिडिटी वाढत.े अ‍ॅसिडिटीमुळे क्रोध वाढतो. वाणीचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा म्हणजे वादविवाद वाढणार नाहीत. क्रोध जीवनाचा घात करतो म्हणून क्रोधाची तीव्रता कमी करुन शांततेला प्राधान्य द्यावे. क्रोध आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे क्रोध कमी होतो. क्रोधावर संयम ठेवावा. चांगले काम करावे म्हणजे जीवन आनंदी राहील. क्रोधापासून मुक्ती मिळवावी.
जीनवाणी ऐकणे पुण्याचे आहे. पाण्याची किंमत लक्षात घेतली नाहीतर भविष्यात कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. असलेल्या सोयी, सुविधांचा कमीत कमी वापर करावा. अन्नाशिवाय आपण जगू शकतो परंतु पाण्याशिवाय क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. अन्न, वस्त्र शास्त्राची निर्मिती मानव करु शकतो. परंतु पाण्याची निर्मिती ही निसर्ग करते. पाण्याची बचत करा, पाण्याची किंमत ओळखावी, संतसंगती करा, तहानलेल्यांना पाणी पाजण्याचे पुण्य मिळवावे.
    - पू. श्री. सन्मती महाराज

Web Title: Restraint on anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.