भंडारदरा परिसरात आढळला दुर्मिळ कोब्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:55 PM2018-02-24T13:55:32+5:302018-02-24T13:55:32+5:30

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील चिंचोंडी गावाच्या हद्दीत रस्त्यालगत दुर्मिळ कोब्रा जातीचा साप आढळला. साडेआठ फुट लांबीचा हा कोब्रा साप असून, तो कुतूहलाचा विषय बनला आहे.

The rare cobra found in the Bhandardara area | भंडारदरा परिसरात आढळला दुर्मिळ कोब्रा

भंडारदरा परिसरात आढळला दुर्मिळ कोब्रा

googlenewsNext

भंडारदरा : अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील चिंचोंडी गावाच्या हद्दीत रस्त्यालगत दुर्मिळ कोब्रा जातीचा साप आढळला. साडेआठ फुट लांबीचा हा कोब्रा साप असून, तो कुतूहलाचा विषय बनला आहे.
शनिवारी दुपारी भंडारदरा येथे हॉटेल सुर्याचे मॅनेजर अनिल पवार बाजारासाठी जात असताना एक मोठा कोब्रा जातीचा साप त्यांना दिसला. त्यांनी लगेच सर्पमित्र शुभंम राजेंद्र काळे यांना बोलवले. सर्पमित्र काळे तेथे आले. त्यांनी खूप मेहनतीने या सर्पाला कोणतीही इजा न करता पकडून जंगलात सोडून दिले.
हा दुर्मिळ जातीचा कोब्रा बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. हा सफेद कोब्रा दुर्मिळ असल्यामुळे कुतुहलाचा विषय झाला आहे.

Web Title: The rare cobra found in the Bhandardara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.