टक्केवारीवरुन जिल्हा परिषदेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:16 PM2019-05-03T17:16:55+5:302019-05-03T17:17:34+5:30

शाळेच्या कामाचे बिल काढण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी टक्केवारी मागितल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जोरदार खडाजंगी झाली़

Ranikandan in the Zilla Parishad from the percentage | टक्केवारीवरुन जिल्हा परिषदेत रणकंदन

टक्केवारीवरुन जिल्हा परिषदेत रणकंदन

Next

अहमदनगर : शाळेच्या कामाचे बिल काढण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी टक्केवारी मागितल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जोरदार खडाजंगी झाली़ जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे यांनी या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले़
गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सदस्य सुप्रिया झावरे, संदेश कार्ले, अनिल कराळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते़
सभेत संदेश कार्ले यांनी शाळांच्या दुरुस्तीसाठी अधिकारी टक्केवारी खात असल्याचा आरोप करीत एका कार्यकारी अभियंत्याची पोलखोल केली़ ते म्हणाले, एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी नाही़ मात्र, ज्या शाळांची कामे ठेकेदार कमी रकमेत करीत आहेत, अशा ठेकेदारांकडूनही टक्केवारी घेतली जात आहे़ त्यांच्या या आरोपानंतर संबंधित कार्यकारी अभियंत्यांची चौकशी करावी, अशी मागणी करीत सदस्य अनिल कराळे यांनीही अधिकाºयांवर जोरदार हल्ला चढविला़ सदस्यांच्या आक्रमक मागणीनंतर अध्यक्षा विखे यांनी संबंधित अधिकाºयास १७ मे रोजी होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे कराळे यांनी सांगितले़
‘लोकमत’शी बोलताना कार्ले म्हणाले, कर्जत तालुक्यातील एका शाळेचे काम एका ठेकेदाराने कमी रकमेत उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण केले़ या कामाचे बिल काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांकडे फाईल पाठविली़ मात्र, संबंधित अधिकाºयाने थेट ठेकेदाराला जिल्हा परिषदेत बोलावून घेतले़ एका सभापतीच्या खुर्चीवर बसून हा अधिकारी ठेकेदारांकडून पैसे वसूल करीत होता़ ही बाब समजल्यानंतर त्या दालनात धाव घेऊन संबंधित अधिकाºयांची आपण कानउघडणी केली़ मात्र, तरीही अधिकारी दहा हजाराच्या रकमेसाठी अडून बसला होता़

Web Title: Ranikandan in the Zilla Parishad from the percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.