शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

गार्डशिवाय धावली रेल्वे; विसापूर स्थानकातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 5:42 PM

विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेली रेल्वे गार्डविनाच रेल्वे स्टेशन सोडून गेली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

विसापूर : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेली रेल्वे गार्डविनाच रेल्वे स्टेशन सोडून गेली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.कर्नाटक संपर्क क्रांती मेल, हजरत निजामोद्दीन ते यशवंतपूर व हुबळी-बनारस या गाड्यांची विसापूर रेल्वे स्थानकावर क्रॉसिंग होती. क्रॉसिंगसाठी कर्नाटक संपर्क क्रांती मेल विसापूर स्थानकात थांबलेली असताना गार्ड चहासाठी बाहेर गेला. मात्र गाडीला स्थानक सोडण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला. चालक व गार्डचे भ्रमणध्वनीवरून बोलणे न होताच व गार्डकडून हिरवा झेंडा न मिळताच चालकाने गाडी चालू करून विसापूर स्थानक सोडले.गाडी काही अंतरावर पुढे गेल्यानंतर ही बाब गार्ड व स्थानक व्यवस्थापकांच्या निदर्शनास आली. स्थानक व्यवस्थापकांनी भ्रमणध्वनीवरून चालक व पुढील कुकडी साखर कारखान्याजवळील रेल्वे गेट नंबर १६ च्या गेटमनशी संपर्क साधल्यानंतर मोटरसायकलवरून गार्डला गेट नं.१६ येथे सोडण्यात आले. त्यानंतर गाडी दौंडच्या दिशेने मार्गस्थ झाली. मेल गाड्यांना विसापूर स्थानकावर थांबा नाही, परंतु विसापूर स्थानक दौंड व नगर दरम्यानचे क्रॉसिंग स्थानक आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRailway Passengerरेल्वे प्रवासी