शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मुळा, भंडारदरा पाणलोटात आषाढ सरी कोसळल्या; घाटघरला १२५, रतनवाडीला १०९ मिलीमिटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 4:14 PM

अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंगड-रतनगड-घाटघर-कळसुबाई परिसरात उत्तराषाढाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटघर येथे १२५ तर रतनवाडी येथे १०९ ...

अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंगड-रतनगड-घाटघर-कळसुबाई परिसरात उत्तराषाढाच्या जोरदार सरी कोसळल्या. घाटघर येथे १२५ तर रतनवाडी येथे १०९ मिलीमिटर पाऊस झाला. भंडारदरा धरणात रविवारी १९७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे.अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगर शिखरांशी ढगांची झुंबी होत मान्सून सक्रिय झाला आहे. भात खाचरांमध्ये पाणी साठले आहे. यामुळे भात रोपांच्या आवणीला वेग आला आहे.भंडारदरा धरणात रविवारी नव्या १९७ तर १ जून २०२० पासून १ हजार २२३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. १९८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबीत व ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर तेरा छोटे लघुपाटबंधारे प्रकल्प ही लवकरच ओसंडीतील अशी आशा बळावली आहे.भंडारदराधरणात ३ हजार ८४ दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ४ हजार ७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आजमितीस आहे. १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणात ३८५ पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ७ हजार ७८० दशलक्ष घनफूट असून यंदा केवळ १ हजार १६७ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक आतापर्यंत झाली आहे.पावसाची सोमवारी झालेली नोंद व यंदा १ जूनपासून पडलेला पाऊस असा- घाटघर-१२५/११०२, रतनवाडी- १०९/७५३, पांजरे- ७५/२९२, भंडारदरा- ६५/५४१, वाकी- ४३/४३०, निळवंडे- २८/३६९ मी.मी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेRainपाऊस