सव्वातीन लाख कोरोना रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:25+5:302021-09-18T04:23:25+5:30

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १९०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटिजन चाचणीत २७७ रुग्ण बाधित आढळले. ...

A quarter of a million corona became sick | सव्वातीन लाख कोरोना रुग्ण झाले बरे

सव्वातीन लाख कोरोना रुग्ण झाले बरे

Next

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १९०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटिजन चाचणीत २७७ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १३, जामखेड १, कोपरगाव १, नगर ग्रामीण १६, नेवासा १, पारनेर २२, पाथर्डी ३०, राहता १, राहुरी २, संगमनेर ७७, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर २, कॅंटोन्मेंट बोर्ड २, इतर जिल्हा ३ आणि इतर राज्य २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ११, अकोले १८, जामखेड ३, कर्जत ११, कोपरगाव ४, नगर ग्रामीण २५, नेवासा ३०, पारनेर २८, पाथर्डी १०, राहाता ६२, राहुरी २३, संगमनेर ६८, शेवगाव ४४, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत २७७ जण बाधित आढळले. यात मनपा २, अकोले ३७, जामखेड ६, कर्जत १८, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ६, नेवासा १३, पारनेर ३९, पाथर्डी २२, राहाता ३१, राहुरी १३, संगमनेर ६६, शेवगाव ६, श्रीगोंदा २, श्रीरामपूर ४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

----------

बरे झालेली रुग्णसंख्या : ३,२४,८२५

उपचार सुरू असलेले रुग्ण : ५२९७

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६६९७

एकूण रुग्णसंख्या : ३,३६,८१९

Web Title: A quarter of a million corona became sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.