नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांच्या गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 01:37 PM2021-01-18T13:37:10+5:302021-01-18T13:38:27+5:30

अहमदनगर शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. 

Push to Shiv Sena in Navnagapur; Dominance of the mountain-spray group | नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांच्या गटाचे वर्चस्व

नवनागापूरमध्ये शिवसेनेला धक्का; बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांच्या गटाचे वर्चस्व

googlenewsNext

अहमदनगर : शहरालगत असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकून बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. 

मागील वेळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बंडू सप्रे यांनी वर्चस्व मिळविले होते. यावेळी बबन डोंगरे, दत्ता सप्रे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. महापौर बाबासाहेब वाकळे यांचे दत्ता सप्रे हे व्याही आहेत. व्याह्यांसाठी महापौर वाकळे हे ही मैदानात उतरले होते. तर सेनेकडून माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी या निवडणूक सक्रीय होते. 

बबन डोंगरे-दत्ता सप्रे यांनी  निवडणूक एकत्र निवडणूक लढविल्याचा फायदा झाला. यामुळे त्यांच्या गटाला १३ जागा मिळाल्या. बंडू यांना ४ जागांवरच समाधान मानावे लागले. 

Web Title: Push to Shiv Sena in Navnagapur; Dominance of the mountain-spray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.