शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कर्जतला मिळणार ७० वर्षांनी शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 9:05 PM

तब्बल ७० वर्षानंतर कर्जतकरांना जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया झालेले शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. कर्जत नगरपंचायतीचा २८ कोटी रूपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२८ कोटी रूपये खर्चुन जलशुद्धीकरण प्रकल्प

कर्जत: तब्बल ७० वर्षानंतर कर्जतकरांना जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया झालेले शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे.कर्जत नगरपंचायतीचा २८ कोटी रूपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. कर्जतच्या पाणी प्रश्नासाठी अनेक आंदोलने झाली. अनेक राजकीय पक्षांनी आम्ही पाणी देतो, तुम्ही आम्हाला मतदान करा, असे म्हणत अनेक निवडणुका जिंकल्या. मात्र गेल्या ७० वर्षांमध्ये कर्जतकरांना पाण्यासाठी भटकंतीच करावी लागली. कर्जतसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अजून झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी राज्यात भाजप आल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षपदी भाजपचे नामदेव राऊत यांची निवड झाली. नगरपंचायतीचा कारभार हाती घेताच त्यांनी पालकमंत्री शिंदे यांच्याकडे कर्जतच्या पाणी पुरवठा योजनेचा विषय प्रथम प्राधान्याने मांडला. पालकमंत्र्यांनी प्रस्ताव तयार करून तो सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी त्यांचे वजन वापरून कर्जतच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवून दिली.राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून २८ कोटी रूपये मंजूर केले. नगराध्यक्षांनी या कामाकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण करून घेतले आहे. केड येथील भीमा नदीच्या पात्रात दोन विहिरी घेऊन त्यावर २२० अश्वशक्तीच्या दोन वीज मोटारी बसविल्या आहेत. येथून हे पाणी राशीन मार्गे ३३ किलोमीटर जलवाहिनीद्वारे कर्जतला आणले आहे. कर्जत येथे ५ दशलक्ष क्षमतेचा हा प्रकल्प उभारला आहे. गावठाण, जोगेश्वरवाडी व समर्थनगर येथे प्रत्येकी एक अशा तीन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. कर्जत शहर व उपनगरांना पाणी पुरवठा करण्यासाठी ५२ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. घरगुती नळ जोड देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पाणी पुरवठा योजनेची चाचणी यशस्वी झाली आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत