शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पाथर्डी शहरानजीक खासगी बस, टेंपो अपघातात दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:36 PM

पाथर्डी शहरानजीक खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पाथर्डी : खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पाथर्डी शहरानजीक माळीबाभूळगाव हद्दीत मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये सोपान ढाकणे (वय ३२, रा.परभणी),परमेश्वर लोखंडे (वय ३०, रा. रुई ता.गेवराई) या चालकांचा समावेश आहे.नगरहून येणारी खाजगी बस व बीड कडून येणा?्या मालवाहक आयशर टेम्पो यांच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोनही वाहनांचे चालक जागीच ठार झाले आहेत.खासगी बस नगरहून येत होती तर टेंम्पो बीडकडून येत होता. माळीबाभूळगाव हद्दीत या दोन वाहनांमध्ये जोराची धडक झाली. यामध्ये बस चालक सोपान ढाकणे व टेम्पो चालक परमेश्वर लोखंडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.पोलीस हवालदार अरविंद चव्हाण, संजय अकोलकर, पो.कॉ.नईम पठाण, पोलीस नाईक वाल्मिक पारदी व ग्रामस्थांनी बसमधील जखमींना रुग्णालयात हलविले. ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही वाहनाचा दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन दोन्ही चालकाचे मृतदेह केबिनमध्ये अडकले होते. पोलिस व स्थानिक नागरिक विकास राठोड यांनी तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह व वाहने रस्त्यावरून जेसीबीच्या साह्याने बाजूला काढले. तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या नुतनीकरणासाठी दीड वर्षापासून खोदून ठेवल्याने या रस्त्याने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत.सरासरी आठवड्याला अपघात होत असल्याने हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी