पुणे जिल्ह्यात बनावट नोटा छापखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 04:55 AM2019-11-10T04:55:10+5:302019-11-10T04:55:15+5:30

एका विहिरीत, ओढ्यातील पाण्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी दिली.

Print fake currency print in Pune district | पुणे जिल्ह्यात बनावट नोटा छापखान्यावर छापा

पुणे जिल्ह्यात बनावट नोटा छापखान्यावर छापा

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकीतील बनावट नोटा तयार करणाऱ्या छापखान्यावर श्रीगोंदा पोतेभर बनावट नोटा, इतर साहित्य तेथीलच एका विहिरीत, ओढ्यातील पाण्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी दिली.
घोगरगाव (ता. श्रीगोंदा) येथील कारवाईचे धागेदोरे आता बारामती, दौंडपर्यंत गेले आहेत. या प्रकरणी सुमीत भिमराव शिंदे (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे), युवराज लक्ष्मण कांबळे (रा. वसंतनगर, ता. बारामती, जि. पुणे) यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच श्रीकांत माने (रा. बारामती), अतुल आगरकर (रा. सुपा, ता. पारनेर) यांना पोलिसांनी अटक केली होती.
श्रीकांत माने हाच या बनावट नोटा बनविणाऱ्यांमधील प्रमुख असल्याचे समजते. खडकी येथे तो बनावट नोटा तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करे. या टोळीने कोट्यवधी रूपयांच्या बनावट नोटा बाजारात वितरित केल्याचे समजते.
>बनावट नोटा तयार करून वितरित केल्या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. आणखी दोघेजण चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकराच्या मुळाशी जाऊन नोटा कोणी कोणी विकत घेतल्या. त्याचे बाजारपेठेत कसे वितरण केले. याचा शोध घेणे सुरू आहे.
- सतीश गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा

Web Title: Print fake currency print in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.