फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:22+5:302021-05-01T04:20:22+5:30

शेवगाव : कोरोना संकटकाळात तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत असून, सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी कोरोना ...

Preference should be given to teachers working as frontline workers | फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे

फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे

Next

शेवगाव : कोरोना संकटकाळात तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत असून, सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र कॅम्प लावावा, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड व प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांच्याकडे केली आहे.

कोविड १९ चा प्रादुर्भाव सद्यस्थितीत अतिशय वेगाने वाढत असल्याने दररोज नियमितपणे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात ७०८ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. सध्या स्थानिक पातळीवर माझे कुटुंब माझी जवाबदारी कुटुंब सर्वेक्षण कामी तसेच काही शिक्षकांना कोविड केअर सेंटर व चेकपोस्टवर कर्तव्य बजाविण्याचे आदेश तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिले आहेत. काम करताना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास निश्‍चित फायदा होईल. लसीकरणासंदर्भात सर्व शिक्षकांचे मोबाईल क्रमांक व आधारकार्ड नंबर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या कार्यालयात पेनड्राईव्हमध्ये तहसील व आरोग्य विभागास माहिती देण्यात आलेली आहे, असे गटशिक्षणाधिकारी कराड यांनी सांगितले.

संघटना प्रतिनिधी समन्वय समितीचे नेते रघुनाथ लबडे, प्रल्हाद गजभिव, रमेश गोरे, सुभाष घुले, बलभीम मुखेकर, रा. भि.बडे, ए. एस. शिरसाठ, तात्यासाहेब बोडखे, काशिनाथ दौंड, रामकृष्ण काटे, मच्छिंद्र भापकर, सुखदेव डेंगळे, विलास लवांडे, गोरक्षनाथ होडशिळ, अशोक ढाकणे, राजकुमार शहाणे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Preference should be given to teachers working as frontline workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.