शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

प्रवरा, मुळा नदीवरील पुलाचे चिरेबंदी चिरे आजही भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:05 AM

प्रवरा व मुळा नदीवरील ‘इंग्रज’राजवटितील दगडी पुलांचे चिरे आजही शाबूत आहे. पुलाची वाडी रुंभोडी येथील दगडी पूल ही बिटिशकालीन देणं आहे.  दगडी चि-यांच्या कमानदार बांधकामावर भक्कम दगडी फरशी बसविलेली आहे.

हेमंत आवारीअकोले : प्रवरा व मुळा नदीवरील ‘इंग्रज’राजवटितील दगडी पुलांचे चिरे आजही शाबूत आहे. पुलाची वाडी रुंभोडी येथील दगडी पूल ही बिटिशकालीन देणं आहे.  दगडी चि-यांच्या कमानदार बांधकामावर भक्कम दगडी फरशी बसविलेली आहे. छणीटाकाने घडविलेल्या दगडांचा ‘जडत्व आणि गुरूत्वीयबल’असा शास्त्रशुध्द मेळ घालत यापुलांची निर्मिती झाली आहे.तालुक्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कळस येथील दगडी पूल काल परवापर्यंत वाहतुकीचा बोजा सोसत होता. कळस, कोतूळ, भंडारदरा, केळुंगन, ब्राम्हणवाडा, पाडाळणे, भोजदरी, विठे घाट, पानओढा, औरंगपूर येथे दगडी कमानीचे छोटे पूल होते. आता त्या ठिकाणी थोडा बदल करण्यात आला आहे.फुलोत्सवाचे गीत गाणा-या कोंदनशिल्प हरिश्चंद्रगडावर बंगला बांधला होता. या दगडी बंगल्यात शौचालय देखील होते. याची साक्ष भग्न अवशेष देत आहेत. दुर्गम कुमशेतजवळ ‘जॉन’नावाच्या अधिका-याने जायनावाडी येथे बांधलेला बंगला आजही ठणठणीत असून पर्यटक आवर्जून हा बंगला पाहण्यासाठी येतात. या बंगल्याचा एकही चीरा निखळलेला नाही. फोफसंडी येथील इंग्रजकाळातील बंगला मोडकळीस आला आहे.तालुक्यातील डाक बंगले, नाव बंगले आजही डागडूजी करुन सुस्थितीत आहेत. वास्तुशास्त्राचा आधार घेत तयार झालेले लाकडी चौमोळी बारी, वाकी, अकोले, पांगरी, ब्राम्हणवाडा, कोतूळ, समशेरपूर येथील शासकीय विश्रामगृहे उभी आहेत. उत्कृष्ट वास्तुशिल्पाचे हे नमूने असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुणावत आहेत. बांधकामाची मुदत संपल्याची  माहिती इंग्रज सरकारकडून कळविली जाते. यावरुन त्यांनी जतन केलेल्या अभिलेखांची महती मिळते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAhmednagarअहमदनगर