Police suspended taking money | पैसे घेतल्याने पोलीस कर्मचारी निलंबित
पैसे घेतल्याने पोलीस कर्मचारी निलंबित

अहमदनगर : पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला बुधवारी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी तडकाफडकी निलंबित केले. सांगळे हे वाहतूक शाखेत असताना वाहतूक नियंत्रणाची ड्युटी बजावताना त्यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते.
त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सिंधू यांनी ही कारवाई केली.


Web Title: Police suspended taking money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.