शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धूमस्टाईल डॉन अन् नगरचे पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 7:25 PM

डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन भी है’ हा अमिताभ बच्चनच्या ‘डॉन’ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग सध्या नगरच्या पोलिसांना तंतोतंत लागू होत आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन भी है’ हा अमिताभ बच्चनच्या ‘डॉन’ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग सध्या नगरच्या पोलिसांना तंतोतंत लागू होत आहे. एकीकडे मोठमोठे गुन्हेगार गजाआड केल्याचे पोलीस सांगत आहेत़ दुसरीकडे मात्र नगर शहरात आणि जिल्ह्यात सर्वत्रच धूमस्टाईलने दागिने, पैसे आणि मोबाईल ओरबाडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ याच धूमस्टाईलने येणाºया डॉनने मागील आठवड्यात नगर शहरात एकाच दिवशी भरदिवसा तीन महिलांचे दागिने ओरबाडले़ नगरमधील महिलांना सध्या तर गळ्यातील दागिने घरात ठेवून घराबाहेर पडावे लागत आहे़ शहरातील पोलीस ठाणे स्मार्ट झाले पण स्मार्ट पोलिसिंग करून पोलीस या चोरट्यांना कधी पकडणार असाच प्रश्न सध्या नगरकर विचारत आहेत.जिल्ह्यात एखादी संवेदनशील घटना घडली की, संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट होते़ सर्व कामे बाजूला ठेवून त्या घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद केले जाते़ यातून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो़ नगर शहरात जेव्हा भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून चोरटे चार चौघातून पसार होतात़ तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था किती अबाधित आहे हाच प्रश्न निर्माण होतो़ मागील दोन महिन्यात नगर शहर आणि परिसरात चोरट्यांनी भरदिवसा १५ महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले आहेत़ ११ रस्तालूट तर २२ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ दुचाकीवरून आलेले चोरटे जेव्हा गडबडीत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावतात तेव्हा अनेक महिला जखमी झाल्या आहेत़ काही महिलांची मान दुखावली गेल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले आहेत़भारतीय संस्कृतीत ‘मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं’ असे समजले जाते़ सध्या मात्र चोरट्यांच्या भितीमुळे महिलांना हे सौभाग्याचं लेणं घरी कपाटात काढून ठेवून घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे़ नगर शहरात महिलांना इतके असुरक्षित वाटत असेल तर पोलीस करतात काय? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़मध्यंतरी तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मोठे बदल करण्यात आले़ इमारतीला रंगरंगोटी करून वृक्षारोपण, खेळाचे ग्राऊंड, माणुसकीची भिंत असे उपक्रम राबवित पोलीस ठाणे स्मार्ट बनविण्यात आले़ या स्मार्ट पोलीस ठाण्यात बसलेले पोलीस दादा चोरट्यांना पकडण्याचे सोडून फक्त खुर्च्याच उबवत असतील तर जनतेने तक्रार कुणाकडे करायची़ मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अनेक सराईत आणि कुख्यात गुन्हेगारांना गजाआड केले़ मात्र जे कुख्यात नाहीत, ज्यांचे पोलीस दप्तरी रेकॉर्ड नाही अशा अनेक नवीन टोळ्या नगर शहर आणि जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत़ हेच चोरटे सध्या भुरट्या चोºयांपासून ते घरफोडीपर्यंतचे गुन्हे करत आहेत़ ही बाब पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला माहित नाही का? या चोरट्यांचा पोलिसांना कसा ठावठिकाणा सापडत नाही़दुचाकीवरून येणा-या चोरट्यांनी महिलेचे दागिने ओरबाडल्यानंतर पुढील काही मिनिटातच संबंधित महिला जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन माहिती देते़ यावेळी तातडीने त्या चोरट्यांना शोधण्याऐवजी आधी पारंपरिक पोलिसी स्टाईलप्रमाणे चौकशी होते़ मग फिर्याद़़़फिर्याद झाली की, विषय संपला़़़़समांतर तपासादरम्यान एलसीबीच्या हाती चोरटे लागले तर ठिक नाहीतर या घटनेचा तपास पुढे सरकत नाही़ पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता, कामाचा लोड अशा सबबीखाली जर चोरट्यांना मोकळे रान मिळाले तर येणा-या काळात या नगर शहरात महिलांना दागिने घालून घराबाहेर पडणे मुश्किल होईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस