मांडवगण येथे गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:16+5:302021-05-17T04:20:16+5:30

मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे पोलीस पथकाने शनिवारी (दि.१५) दुपारी गांजाच्या शेतीवर छापा टाकला. येथे एकास अटक करून ...

Police raid cannabis farm at Mandvagan | मांडवगण येथे गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा

मांडवगण येथे गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा

Next

मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे पोलीस पथकाने शनिवारी (दि.१५) दुपारी गांजाच्या शेतीवर छापा टाकला. येथे एकास अटक करून ११० गाजांची झाडे जप्त केली. येथे ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत रविवारी श्रीगोंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

रामदास गेणू रायकर (वय ४०, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रामदास रायकर यांनी मांडवगण येथील गट नंबर ४५६/ १२ मधील शेतात मोठ्या प्रमाणावर गाजाच्या झाडांची लागवड केली आहे, अशी माहिती खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्यासह शनिवारी दुपारी शेतावर छापा टाकला. यावेळी शेतात गांजाची झाडे आढळून आली. संपूर्ण शेताची पाहणी केली असता त्यामध्ये लहान-मोठी ११० गांजाची झाडे आढळून आली. त्यांचे वजन ५४ किलो भरले. दहा हजार रुपये किलो याप्रमाणे त्याची रक्कम ५ लाख ४० हजार इतकी झाली.

रायकर याने गावापासून दूर अंतरावर असलेल्या माळरानाच्या शेतावर कोणाच्याही नजरेस पडणार नाही, अशा ठिकाणी गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रामदास रायकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, प्रकाश दंदाडे, इंगवले यांनी केली.

-----

१६ मांडवगण गांजा

मांडवगण येथील गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एकास अटक करण्यात आली.

Web Title: Police raid cannabis farm at Mandvagan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.