पारनेमध्ये अनेक मतदारांचे प्रभागच बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:05+5:302021-02-16T04:23:05+5:30

पारनेर : नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. अनेक प्रभागामधील मतदार दुसऱ्याच प्रभागात गेले असून काही प्रभागात बाहेरील ...

In Parne, the wards of many voters changed | पारनेमध्ये अनेक मतदारांचे प्रभागच बदलले

पारनेमध्ये अनेक मतदारांचे प्रभागच बदलले

Next

पारनेर : नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. अनेक प्रभागामधील मतदार दुसऱ्याच प्रभागात गेले असून काही प्रभागात बाहेरील गावातील मतदार समाविष्ट झाल्यामुळे मतदार यादीत मोठा गोंधळ झाला आहे.

पारनेर नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादी सोमवारी नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी प्रसिद्ध केली. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पाहण्यासाठी नगरपंचायतमध्ये इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान अनेक प्रभागातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये शहराच्या बोळकोबा गल्ली, शिवाजी पेठ, गणपती गल्ली येथील मतदारांची नावे आली आहेत, असे रायभान औटी यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक दोनमधील अनेक मतदारांची नावे प्रभाग चारमध्ये गेल्याचे निलेश खोडदे यांनी सांगितले. प्रभाग बारामधील अनेक नावे प्रभाग अकरा व प्रभाग तेरामध्ये गेली. या प्रभागात बाहेरील नावे आली असल्याचे सुभाष कावरे यांनी सांगितले.

---

नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीमध्ये काही हरकती असतील तर २२ फेब्रुवारीपर्यंत नगरपंचायत कार्यालयात लेखी स्वरूपात जमा कराव्यात.

-

डॉ. सुनीता कुमावत,

मुख्याधिकारी, नगरपंचायत, पारनेर.

Web Title: In Parne, the wards of many voters changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.