मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 02:10 PM2019-07-07T14:10:24+5:302019-07-07T14:11:06+5:30

मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़

Only the remaining of the radish dam | मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

googlenewsNext

भाऊसाहेब येवले
राहुरी : मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़ खरं म्हटलं तर मुळा धरणाची उभारणी शेतीसाठीच झालेली आहे़ काळाच्या ओघात शेतीसाठी बांधलेले मुळा धरण पिण्यासाठी व उद्योगासाठी उरले़ शेतीच्या पाण्याची कपात होत असल्याची जाणीव उशिराने शेतकऱ्यांना झाली आहे़
मुळा धरणाचा उजवा कालवा निघाला़ डावा कालवा निघावा म्हणून डॉ़ बाबूराव दादा तनपुरे, का़ ल़ पवार, केशवराव हारदे आदींचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत़ बी़ जे़ खताळ यांचे योगदानही पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना महत्वाचे ठरले़ डावा कालवा निघाला नसता तर राहुरीचा उत्तर भाग उजाड राहिला असता़ डाव कालवा सुरू झाला़ लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम झाले़ दोन्ही कालव्याचे पाणी ब्लॉकने घेण्याऐवजी शेतकºयांनी ब्लॅकने घेतले़ तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी ७ नंबरचा फॉर्म भरावा म्हणून शेतकºयांना अनेकदा विनवणी केली़ मात्र शेतकºयांनी त्याकडे दुर्लक्ष
केले़ कागदोपत्री शेतीसाठी
मुळा धरणातील पाण्याला मागणी नव्हती़
२००५ मध्ये समन्याय पाणी वाटप झाले़ मध्यरात्री २ वाजता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सह्या केल्या़ मुळा धरणाच्या पाण्यात जायकवाडी वाटेकरी ठरला़ खरे तर सह्या करणाºया जिल्ह्यातील आमदारांना शेतकºयांनी जाब विचारायला हवा होता़ मात्र तसे धाडस कुणीही केले नाही़ जायकवाडीला जाणाºया पाण्यालाच शेतकºयांचा विरोध आहे़ मुळाचे पाणी बीडसह अनेक शहरांना भविष्यकाळात जाणार आहे़ त्यामुळे मुळा धरण भविष्यात केवळ पिण्यासाठी उरणार आहे़ भविष्यात थेंबभरही पाणी शेतीसाठी न मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही़ त्यामुळे मुळाच्या दोन्ही कालव्याखालील क्षेत्र ओसाड पडण्याची भीती आहे़
शेकडो वर्षात मुळा नदीच्या काठावरील शेती कधी नव्हे एवढी यंदा संकटात सापडली़ उसाचा पट्टा जिरायती होण्याच्या मार्गावर आहे़ बारामाही वाहणारी मुळा ओस पडली आहे़
मुळा धरणाच्या पाण्यावरून भविष्यकाळात संघर्ष वाढण्याची भीती आहे़ त्यासाठी डाव्या कालव्याबरोबरच उजव्या कालव्याचे शेतकरीही संघर्षाच्या पावित्र्यात आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीतही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत़

तर हुलगे पेरण्याची वेळ येईल
एकेकाळी नगर जिल्ह्याचे सरकारमध्ये वजन होते़ अलीकडील काळात मात्र जिल्ह्यातील नेत्यांची ताकद क्षीण झाली आहे़ जिल्ह्याचे पाणी बाहेर जात असताना पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे़ अन्यथा उसाच्या पट्ट्यात हुलगे पेरण्याची वेळ शेतकºयांवर येण्याचे दिवस लांब नाहीत़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणात पाण्याची आवक सुरू नाही़ पिण्यासाठी केवळ २२५ दलघफू पाणी शिल्लक आहे़ उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले असून पाण्यासाठी एकीची गरज आहे़

Web Title: Only the remaining of the radish dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.