एकतर्फी प्रेम : तरुणीला छळणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:14 AM2019-07-03T11:14:49+5:302019-07-03T11:16:18+5:30

एकतर्फी प्रेमातून तरुणीला रस्त्यात अडवून लग्नासाठी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणा-या तरुणाला दिलासा सेलच्या पथकाने अटक केली़

One-on-one love: The girl gets arrested for harassment | एकतर्फी प्रेम : तरुणीला छळणा-यास अटक

एकतर्फी प्रेम : तरुणीला छळणा-यास अटक

Next

अहमदनगर : एकतर्फी प्रेमातून तरुणीला रस्त्यात अडवून लग्नासाठी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणा-या तरुणाला दिलासा सेलच्या पथकाने अटक केली़ मंगळवारी (दि़०२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील प्रेमदान चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली़
संदेश मनोहर गायकवाड (रा़ राहुरी खुर्द ता़ राहुरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़ नगर शहरात राहणाºया तरुणीची संदेश याच्यासोबत ओळख होती़ मागील दीड वर्षांपासून संदेश हा सदर तरुणीला लग्नाची मागणी घालून त्रास देत होता़ याबाबत पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी येथील स्नेहाधार संस्थेकडे तक्रार केली होती़ मंगळवारी सकाळी संदेश याने सदर तरुणीस फोन केला़ तिने मात्र त्याचा फोन घेतला नाही़ याबाबत तिने स्नेहाधार संस्थेला माहिती दिली़ संस्थेने या तरुणीस स्नेहालयाच्या कार्यालयात बोलाविले़ तरुणी रिक्षात बसून स्नेहालयाच्या कार्यालयाकडे जात होती़ याचवेळी संदेश गायकवाड याने रिक्षाचा पाठलाग सुरू केला़ ही बाब तरुणीच्या निदर्शनास आली तेव्हा तिने पुन्हा स्नेहाधार संस्थेला फोन करून माहिती दिली आणि सदर तरुणी प्रेमदान चौकात रिक्षातून खाली उतरली़ दरम्यान या घटनेबाबत स्नेहाधार संस्थेने दिलासा सेलला माहिती दिली होती़ पे्रमदान चौकात संदेश याने तरुणीचा रस्ता अडवून ‘तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही ते सांग नाहीतर मी तुझा जीव घेईल व मी पण मरण’ असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली़ याचवेळी घटनास्थळी दिलासा सेलचे पथक दाखल झाले़ पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, पोलीस नाईक अर्जुन आव्हाड, सुदाम लोढे, रोहिणी दरंदले व स्वाती गुंजाळ यांनी संदेश गायकवाड याला ताब्यात घेतले़ पोलिसांनी त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक चॉपर व लोखंडी फायटर आढळून आले़ या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे़

Web Title: One-on-one love: The girl gets arrested for harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.